‘भांडुपचा शशी कपूर’ अशी आपली वेगळी ओळख मिळवत अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला विनोदी अभिनेता म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नावारुपाला निखिलने नुकतीच रुपेरी पडद्याद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निखिल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामानिमित्त काही माहिती शेअर करत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या सक्रियतेमुळे व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील त्याचा चाहतावर्गही चांगलाच वाढला आहे.
निखिलने नुकताच इन्स्टाग्रामवर 100k म्हणजेच एक लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आणि यानिमित्ताने त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी खास सेलिब्रेशन केले असल्याचे पाहायला मिळाले. निखिलने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एक लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मित्रमंडळींनी केलेले जंगी सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.
निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याची भाची, आई-वडील व मित्रपरिवार पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओद्वारे त्याने त्याच्या आनंदी भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “100k (एक लाख) फॉलोअर्स पूर्ण झाल्यानिमित्ताने खूप आनंदी आहे. माझ्या या प्रवासात अनेकांचा हातभार आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार.” यापुढे त्याने त्याच्या मित्रमंडळींचा उल्लेख करत त्यांनाही धन्यवाद म्हटले आहे.
आणखी वाचा – अस्तिका पुन्हा नागरुपात, विरोचकाचा तिलाच दोष, कुटुंबातील नव्या सदस्याचा बळी जाणार?, मालिकेला रंजक वळण
दरम्यान, निखिलच्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी “अभिनंदन, शुभेच्छा, असाच मोठा हो” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याला अभिनंदनही म्हटले आहे.