शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वाशी टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन न झाल्यामुळे घेतला टोल, कोकण हार्टेड गर्लच्या बँकमधूनही गेले पैसे, रागात म्हणाली, “भारत चंद्रावर पोहोचला तरी…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 8, 2024 | 1:19 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Konkan Hearted Girl aka Ankita Walawalkar shared a video and commented on the issue of toll

वाशी टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन न झाल्यामुळे घेतला टोल, कोकण हार्टेड गर्लच्या बँकमधूनही गेले पैसे, रागात म्हणाली, "भारत चंद्रावर पोहोचला तरी..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार टोलचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून त्यांनी अनेकदा खळखट्याकदेखील केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नाट्य संमेलनावरुन परतत असताना त्यांनी स्वत: टोल नाक्यावर उतरुन टोल न देता  सर्व गाड्यांना प्रवेश दिल्याचा व्हिडीओदेखीलचांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या टोलबाबतच्या भूमिकांवर अनेकदा संमिश्र प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या गेल्या.

मात्र आता राज ठाकरेंच्या टोलबाबतच्या भूमिकेवर सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावालकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताबरोबर नुकतंच एका टोल नाक्यावर तिच्याकडून दोन वेळा पैसे घेतले गेलं असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. ‘टोल का झोल’ असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओद्वारे तिने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल सर्वांना जागरुक राहण्याचे आवाहनही केल आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

या व्हिडीओ मध्ये तिने असं म्हटलं आहे की, “दिनांक २६ मार्च २०२४ रोजी मी मालवण ते मुंबई असा प्रवास करत होते. वाशी टोलनाक्यावर जेव्हा माझी गाडी आली, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की फास्टटॅग स्कॅन होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही रोख रक्कम द्या आणि मी ते दिले. जेव्हा मी मुंबईत पोहोचले तेव्हा मला फास्टटॅगमधून पैसे गेल्याचाही मॅसेज आला. त्यामुळे माझे दोनवेळा पैसे गेले. यानंतर मी त्या मॅसेजवरील टोल फ्री नंबरवर कॉल पांच दिवस कॉल केले. पण  त्यावर काही प्रतिसाद आलाच नाही.”

आणखी वाचा – अस्तिका पुन्हा नागरुपात, विरोचकाचा तिलाच दोष, कुटुंबातील नव्या सदस्याचा बळी जाणार?, मालिकेला रंजक वळण

यापुढे तिने असं म्हटलं की, “मग मी विचार केला की जाऊ दे, ४५ रुपयेच तर होते. काय एवढा वेळ फुकट घालवायचा? पण माझ्यासारख्या अशा हजारो लोकांनी ४५ रुपये सोडले तर काय होईल… हा विचार करुन मला या विषयावर बोलावसं वाटलं. जेव्हा राजसाहेब (राज ठाकरे) टोलनाक्याच्या मुद्द्यावर बोलतात, तेव्हा कमेंट सेक्शनमध्ये “यांच्याकडे फक्त टोल हा एकच मुद्दा आहे का?” अशा अनेक कमेंट्स येतात. पण टोल हा मुद्दा किती गांभीर्याने घेतला पाहिजे, या टोलमध्ये किती झोल आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.”

आणखी वाचा – Video : “गुलाबी लाली आणि गाल लाल लाल…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या नवऱ्याचं ‘गुलाबी साडी’वरुन भन्नाट गाणं, हसू आवरेना, व्हिडीओ व्हायरल

यापुढे तिने सर्वांना आवाहन करत असं म्हटलं आहे की, “यापुढे कधी तुमची गाडी टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन होत नाही. त्यामुळे रोख रक्कम द्या. असं सांगण्यात आलं तर त्यांना एकच सांगा की, भारत चंद्रावर पोहोचला, तरी पण अजून तुमचे जर स्कॅनर नीट नाहीत तर ते आधी नीट करुन घ्या”. दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्सद्वारे त्यांच्याबरोबरही हा प्रसंग झाला असल्याचे म्हटले आहे.  

Tags: ankita walawalkarKonkan Hearted Girlsocial media influencer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Pushpa 2 Teaser out

Pushpa 2 Teaser : साडी नेसून रौद्र रुप, हटके स्वॅग अन्…; 'पुष्पा २'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.