महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सातत्याने चर्चेत असणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची क्रेज आता जगभरात पसरते आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कार्यक्रम जसा जसा जुना होत जातो तसा विनोदाचा दर्जा घसरताना बऱ्याच रिएलिटी शो मध्ये बघायला मिळत.परंतु हास्यजत्रेच अजून तस झालेलं नाही, ही जमेची बाजू आहे.हास्यजत्रेचा सध्या पार पडणाऱ्या नाशिक दौऱ्याची विशेष चर्चा आहे. (Maharashtrachi Hasyjatra And Shivsena)
हास्यजत्रेमुळे अनेक कलाकार घरोघरी पोहेचले,त्यांच्या नावाला ओळख मिळाली.आणि या शो मुळे अनेक हास्यविर मराठी सिनेसृष्टीला मिळाले. मनोरंजन आणि राजकारण यांचा बऱ्याचदा जवळून येणारा संबंध बघायला मिळतो. अनेक कलाकार सध्या राजकारणात ही त्याच जोमाने सक्रिय होत आहेत, तर अनेक सिनेसृष्टीतील कार्यक्रमांना राजकारण्यांची उपस्थिती पाहायला मिळते.
पाहा असा पार पडला शिवसेनेचा वर्धापन सोहळा (Maharashtrachi Hasyjatra And Shivsena)
नुकताच असाच एक कार्यक्रम पार पडला तो म्हणजे शिवसेना पक्षाचा ५७वा वर्धापन दिन.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडला.तसेच या कार्यक्रमाला हास्यजत्रेतील चेतना भट, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, शिवाली परब,प्रियदर्शनी इंदलकर,नम्रता संभेराव आणि समीर चौघुले या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.त्याच सोबत त्यांनी स्किटचे सादरीकरण देखील केले.
याबाबतची पोस्ट, शिवसेना पक्षाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आली आहे,या पोस्टच्या कॅप्शन मध्ये म्हंटल आहे, आज शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त निष्ठावंतांचा कुटुंबसोहळा षण्मुखानंद सभागृह येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या प्रसंगी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा उपस्थित शिवसैनिकांनी आनंद घेतला.तसेच शिवालीने देखील या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मधून शेअर केले आहेत.(Maharashtrachi Hasyjatra And Shivsena)
हे देखील वाचा : ‘जुईची स्पेशल डेट’-कॅप्शनने वेधलं लक्ष