महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात हीने तिच्या भूमिकांनी, विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. तर काही महिन्यापूर्वी ती तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. तिने फेब्रुवारी महिन्यात तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा पासून या कपिलची सोशल मीडियावर नुसती हवा पाहायला मिळते. सुमित आणि वनिता हे दोघेही सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करतात. अश्यातच वनिताने एक रील व्हिडीओ शेअर केला. यात तीच्या नवऱ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत त्याला टोपण नावाने हाक मारते.(vanita kharat)
वनिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तीच्या पतीला ये फगुनिया म्हणताना दिसते. ये फगुनिया तू हमारा जान है रे, जान तेरेको इतना चाहते है, इतना चाहते है ,कितना चाहते है,की सीन चिरके दिखाये बजरंबली जैसा.असं म्हणते. ती त्याच्या गालावर चुंबन देखील घेत आहे.यासोबतच त्यांनी लिपलॉक देखील केलं.ताईचा यात तिने हा नवाजुद्दीन सिद्दकीचा गाजलेला डायलॉग असून हमारा फगुनिया असं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला. तर तुम्हाला माहित आहे का? हा त्यांच्या पहिला रील व्हिडीओ आहे. #firstreel असं दर्शवत तिने व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्या व्हिडिओवर हास्याचा वर्षाव केला.
हे देखील वाचा – बहरला मधुमास या गाण्याची स्वराज आणि मंजुळाला भुरळ
वनिता आणि सुमितचे या आधीदेखील लिपलॉकचे फोटो व्हायरल झाले होते. प्री वेडिंगला त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. यात वनिताने सुमितला लिप किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.तिच्या या फोटोची चर्चा सर्वत्र रंगली होती.विशेष म्हणजे अभिनेत्रीने आपला लग्न सोहळा खूप खासगी ठेवला होता.एवढंच नाही तर वनिता आणि सुमित यांनी त्यांचे हळदी, विधी, फेरे आणि स्वागत समारंभ हे सगळे सोहळे एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी पार पाडले होते. लग्नाच्या दोन- तीन दिवसांनंतरच वनिता कामावर रुजू झाली होती.त्यांची प्रेमकथा पण खूप रंजक आहे. लूडो या ऑनलाईन खेळातून त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनतर प्रेम. लग्नांनंतरही हे दोघे सोशल मीडियावर देखील एकमेकांच्या कामाचं कौतुक करतात.(vanita kharat)
