अभिनेत्री जान्हवी किल्लेकर भाग्य दिले तू मला या मालिकेतील तिच्या सानिया या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत असते. प्रेक्षकांच्या शिव्या मिळणं म्हणजे खलनायक हे पात्र वठवन आपल्याला जमलं आहे असं एक समीकरणच आहे. आणि जान्हवीला ते उत्तम जमलं आहे. तिची सानिया ही भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. (Jahnavi Killekar And Ishan Killekar)
परंतु पडद्यावरील कलाकार आणि पडद्यामागचे कलाकार खूपच वेगळे असतात. हे आपण सगळेच जाणतो.पडद्यावरती जान्हवी स्वार्थी आहे. नाती जपणं तिला जमत नाही. मोहिते कुटुंबाला सतत काहीना काही कटकारस्थान करून त्रास देताना पहायला मिळते. राज-कावेरीला त्रास देण्याची एकही संधी ती सोडत नाही. सध्या रत्नमाला मोहितेची सर्व प्रॉपर्टी तिने आणि वैदेहीने लुबाडली आहे. कावेरीने चहाची टपरी सुरु केली त्यामध्ये देखील ती अडथळे निर्माण करत आहे. तर मालिकेत सध्या सानिया आणि आदित्यच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
हे देखील वाचा : वर्कआऊट च्या व्हिडिओ वर जान्हवी होतेय ट्रोल
पण जान्हवीची ऑफस्क्रीन धमाल, कलाकारानं सोबतच बॉण्डिंग आपण तिच्या सोशल मीडियावरून बघतच असतो.परंतु कलाकार, त्याचं खरं आयुष्य, कुटुंब याविषयी कायमच प्रेक्षकांना उत्सुकता असते. जान्हवीने तिचा मुलगा ईशान किल्लेकर याच्या सोबतची एक स्टोरी शेअर केली आहे. ईशानचा खूप नटखट अंदाज यात पहायला मिळतोय.कलाकार म्हणून काम करताना मनातल्या आईला कायमच आपल्या लेकरापासून खूप काळ लांब असण्याची खंत असते. त्यामुळे जितका वेळ मिळेल तितका वेळ आपल्या मुलाला देता यावा असं प्रत्येक आईलाच वाटत.नाईट शूट, हेक्टिक शेड्युल यामुळे बरयाचदा कलाकारांचा फॅमिली टाइम कॉम्प्रमाइज होत असतो.(Jahnavi Killekar And Ishan Killekar)

जान्हवी तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.मालिकेचे बीटीएस, सेटवरील कलाकारांसोबत पडद्यामागे केले ट्रेंडींग रील हे सर्व ती तिच्या सोशल मीडिया वरून शेअर करत असते. अलीकडे जान्हवी तिच्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. तिचे जिम मधले वर्कआऊट चे बरेचसे व्हिडिओ ती पोस्ट करते. तिच्या काही व्हीडिज वर प्रेक्षकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. पण जस नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच ट्रोल करत असणाऱ्यनसोबत कौतुक करणारे ही तितकेच आहेत.त्य्यामुळे पडद्यासमोरील आणि पडद्यामागील जान्हवी ही प्रेक्षकांना तितकीच आवडते.