कलाकार मंडळी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून कुटुंबाबरोबर तर कधी मित्र परिवाराबरोबर वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियावरुन ते त्यांच्या चाहत्यांसाठी याबाबतचे नेहमीचे अपडेट करत असतात. अशातच प्रेक्षकांचा लाडका व लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’मधील कलाकार सध्या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत एकत्र फिरायला गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात उष्णतेचं प्रमाण वाढलं असल्याने या उष्णतेपासून सुटका व्हावी म्हणून काहीसा वेळ काढत ही कलाकार मंडळी अलिबाग येथे फिरायला गेलेली पहायला मिळत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Team Planting)
अलिबाग येथे एका गावात ते एन्जॉय करतानाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान ही कलाकार मंडळी सध्या एकत्र असून एन्जॉय तर करत आहेतच याशिवाय आता त्यांच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. वनिताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये वनितासह तिचा नवरा सुमित लोंढे, रोहित माने आणि त्याची बायको, रसिका वेंगुर्लेकर आणि तिचा पती सनी शिंदे, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. ही कलाकार मंडळी केवळ फिरण्यासाठी वा धमाल-मस्ती करण्यासाठी नव्हेतर निसर्गाला काहीतरी मदत व्हावी म्हणून मेहनत ही घेताना दिसत आहेत. त्यांनी अलिबाग येथे जाऊन वृक्षारोपण केलेलं पाहायला मिळत आहे.
अलिबाग येथे फिरायला गेलेले असताना त्यांनी राहिलेल्या होम स्टेजवळ असलेल्या बागेत वृक्षारोपण केलं आहे. यावेळी अत्यंत आनंदाने व निरागस मनाने ही कलाकार मंडळी बागेत मेहनत घेताना दिसली आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.
वनिताने शेअर आधी केलेल्या फोटोमध्ये ही कलाकार मंडळी एकत्र धमाल करताना दिसली. यावेळी गरमीपासून बचाव म्हणून नारळपाणी पिताना दिसली. सध्या ही मंडळी अलिबाग येथील चौल गावात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हास्यजत्रेतील सगळीच कलाकार मंडळी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. परदेशवारीमध्ये ही ते एकत्र फिरताना दिसले आहेत.