कलाकार मंडळी सध्या त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबाबरोबर फिरताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या गावी जात धमाल, मस्ती करताना दिसतात. सोशल मीडियावरुन ते त्यांच्या गावी धमाल करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात सध्या तिच्या कुटुंबाबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे. वनिता व सुमित बरेचदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Vanita Kharat Home)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे लाखो चाहते दिवाने आहेत. या कार्यक्रमातून वनिता खरात हिने आजवर तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. वनिता खरात गेल्या वर्षी लग्नबंधात अडकली. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमित यांचा हा लग्नसोहळा पार पडला.

सोशल मीडियावर वनिता नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आता वनिता व सुमित कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कोकणात पोहोचले आहेत. सुमितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. बायकोच कोकणातलं घर असं कॅप्शन देत सुमितने वनिताच्या घराबाहेरचा एकदा फोटो शेअर केला आहे.
सुमितने शेअर केलेल्या या फोटोत वनिताच्या गावच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. वनिता ही कोकणातील असून तिचं गाव देवगड आहे. अगदी चिऱ्यांचं बांधलेलं आणि कौलारू असं वनिताचं घर आहे. घराबाहेर बरीच अशी मोकळी जागाही पाहायला मिळत आहे. शिवाय दोन नारळाची झाडही पाहायला मिळत आहेत. सुमितने शेअर केलेल्या फोटोवरुन तो सध्या सासरी एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे.