प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते, हा म्हणणं काहींच्या बाबतीत अगदीच तंतोतंत लागू होते. मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार मंडळी ही पडद्यावर झळकत असलीतरी त्यांच्या मागे त्यांचा परिवार व घर सांभाळण्यासाठी एक स्त्री सतत खंबीरपणे उभी असते आणि ही खंबीर स्त्री म्हणजे पत्नी. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आहेत जे आपल्या पत्नीबाबत कायमच व्यक्त होताना पाहायला मिळतात. यापैकी एक कलाकार म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील हास्यवीर समीर चौघुले.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे समीर चौघुले हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. समीर चौघुलेंना या कार्यक्रमामुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबरच ते उत्तम लेखक म्हणूनदेखील ओळखले जातात. हास्यजत्रेतील अनेक गाजलेल्या स्किट्सचं लेखन समीर चौघुलेंनी केलेलं आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे समीर चौघुले हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात.
सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो व स्किट्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आज समीर चौघुले यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. समीर चौघुले यांची पत्नी कविता चौघुले यांचा आज वाढदिवस आहे. याच वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीबरोबरचा एक गोड फोटोही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – मकर व कुंभ राशीसह ‘या’ राशींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता,तर काहींना नोकरीत मिळणार बढती, जाणून घ्या…
पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चौघुले यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या पत्नीविषयी असं म्हटलं आहे की, “कविता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी देवाचे खूप खूप आभार… तुझ्याविना माझं सतत ‘अडणं’ असंच कायम राहू दे… तूला खूप खूप प्रेम”
आणखी वाचा – विरोचकाच्या मृत्युपेक्षा त्याच्याबरोबरचे जीवघेणे खेळ यशस्वी ठरणार का?, देवीआई भक्तांच्या हाकेला धावणार का?
दरम्यान, समीर चौघुले यांनी शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. प्रसाद ओक, मंजिरी ओक, वनिता खरात, श्याम राजपूत, चेतना भट, सुकन्या मोने या मराठी कलाकारांसह समीर चौघुले यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.