मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका हांडेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहून या व्यक्तीला झाला विशेष आनंद, म्हणाली, “तो माझ्यासाठी एनर्जेटिक पॉईंट…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 7, 2023 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Priyanka Hande's family reactions after see Maharashtrachi Hasyajatra

प्रियांका हांडेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पाहून या व्यक्तीला झाला विशेष आनंद, म्हणाली, "तो माझ्यासाठी एनर्जेटिक पॉईंट..."

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवला आहे. कलाकारांचे अफलातून विनोदी अभिनय व सादर होणारे विनोदी स्कीटस यांमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. यामागे कलाकारांचा सहभाग व पडद्यामागील मंडळींचा मोलाचा वाटा आहे. हास्यजत्रेमुळे अनेक अनुभवी कलाकारांसह नव्या दमाच्या कलाकारही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. याच कलाकारांमध्ये प्रियांका हांडेचा नावही हमखास घेतलं जात आहे. हास्यजत्रेची असिस्टंट डायरेक्टर ते हास्यजत्रेची हांडे अशी ओळख बनलेली प्रियांकाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Priyanka Hande Maharashtrachi Hasyajatra)

गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करणारी प्रियांका तीन वर्षांपासून हास्यजत्रेचा भाग आहे. पडद्यामागून सर्व यंत्रणा सांभाळणाऱ्या प्रियांकाने अनेक स्कीटसमधून आपला विनोदी अंदाज दाखवला आहे. पण जेव्हा ही गोष्ट तिने तिच्या घरच्यांना सांगितली, तेव्हा त्यांना विशेष आनंद झाला होता.

पाहा काय होती प्रियांकाच्या घरच्यांची प्रतिक्रिया ? (Priyanka Hande’s family reactions after see Maharashtrachi Hasyajatra)

‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना प्रियांकाने तिच्या पहिल्या परफॉर्मन्सबद्दल घरच्यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त झाली आहे. तुझ्या घरच्यांनी टीव्हीवर तुझं स्कीट पाहिलं, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न जेव्हा तिला विचारला होता. तेव्हा प्रियांका म्हणाली, “मी यात आहे म्हणून माझ्या घरचे हा कार्यक्रम जेव्हा पाहायचे, तेव्हा ते हसत होते. पण माझा एक छोटा भाचा आहे, त्याला मी सतत सांगायचे की, यात तुझी आत्या आहे. तर तो मुद्दामून म्हणतो, की यात आत्या नाही. पण जेव्हा त्याला माझा चेहरा टीव्हीवर दिसायचा, तेव्हा तो म्हणायचा की आत्या आहे. मी माझ्या घरी जेव्हा येते आणि भाच्याला मी दिसले की, तो ‘ए आतु आली, आतु आली’ असा ओरडत माझ्याजवळ यायचा. माझा भाचा माझ्यासाठी एनर्जेटिक पॉईंट आहे. मी खूप भाग्यवान आहे, की या मोठ्या कार्यक्रमाचा भाग आहे.”

पण तिने ही गोष्ट तिच्या घरच्यांना कधी स्वतःहून सांगितली नाही. याचा खुलासा करताना प्रियांका म्हणते, “मी आजपर्यंत माझं स्किट आहे आणि ते बघा म्हणून असं घरी कधीच सांगितलं नाही, कारण माझा अर्धावेळ प्रवासात जातो. मी सेटवरून शूट करून मी रात्री गेले, की सकाळी १०-११ पर्यंत उठून मी तळेगावला जाते. तिथे मी दीड-दोन दिवस राहते. नंतर रिहर्सलच्या दिवशी पहाटेपर्यंत मी इथे येते. त्याकाळात मला घरच्यांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे मी घरी हे कधीच सांगत नाही.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली प्रियांका हांडे हिने अनेक प्रायोगिक व व्यावसायिक नाटक केलं आहे. एकेकाळी हास्यजत्रेची कॉस्च्युम डिपार्टमेंट सांभाळणारी प्रियांका आज याच कार्यक्रमात महत्वाचा चेहरा बनली आहे. (Priyanka Hande’s family reactions after see Maharashtrachi Hasyajatra)

Tags: maharashtrachi hasya jatrapriyanka handesony marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Mrunal Kulkarni home tour

Video : मुंबईमध्ये आलिशान घरात राहतात मृणाल कुलकर्णी, घराची केलेली सजावट पाहून तुम्हीही कराल कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.