शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कोकणातील संस्कृती जपत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने चाळीमध्ये अशी साजरी केली होळी, गवळणही गायली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 26, 2024 | 9:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nikhil Bane Holi Special Video

Video : कोकणातील संस्कृती जपत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याने चाळीमध्ये अशी साजरी केली होळी, गवळणही गायली अन्…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी घराघरात पोहोचले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडलं. तर कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमानं बऱ्याच नवोदित कलाकारांना उत्तम प्लॅटफॉर्म देत प्रेक्षकांच्या मनात घर करण्याची संधी दिली. या कार्यक्रमातील एका अभिनेत्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो अभिनेता म्हणजेच कोकणची संस्कृती जपणारा, चाळीतील संस्कृती जपणारा आपला निखिल बने. (Nikhil Bane Holi Special Video)

निखिलने आजवर त्याच्या हास्यजत्रेतील पंचेसने चाहत्यांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर ही निखिल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच काही ना काही शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. हास्यजत्रेमुळे लोकप्रियतेस आलेल्या निखिलचे पाय आजही जमिनीवर आहेत याचं उदाहरण म्हणजे निखिल आजही चाळ संस्कृतीत राहणारा मुलगा आहे. इतकी लोकप्रियता मिळवूनही निखिलने त्याची चाळ संस्कृती जपलेली पाहायला मिळते. चाळ संस्कृतीचे वारंवार तो धडे देताना दिसत असतो. अनेक चाळीतल्या कार्यक्रमांचे, चाळीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचे अनेक व्हिडीओ, फोटो तो सोशल मीडियावरून शेअर करत असतो.

आणखी वाचा – Holi 2024 : होळीचा सण लय भारी! मराठी कलाकारांनी साजरी केली कलरफुल धूळवड, पाहा हे खास फोटो

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

अशातच निखिलने होळी स्पेशल शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. शिमगोत्सव असं म्हणत त्यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कोकणातील परंपरा जपत होळी साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोकणात होळीनिमित्त खेळले जाणारे खेळे आणि त्यादरम्यान गायली जाणारी गवळण चित्रित केलेली पाहायला मिळत आहे. शंकासुर आणि गवळणचं समीकरण असलेले हे कोकणातील खेळे खेळण्यात निखिलही सहभागी झालेला पाहायला मिळत आहे. टाळ वाजवत निखिलने या होळीनिमित्त कोकणातील खेळांमध्ये सहभाग दर्शवला आहे.

आणखी वाचा – “त्यावेळी जातीचे रंग…”, धूलिवंदननिमित्त कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझ्या आयुष्याची होळी…”

मराठी संस्कृती तसेच कोकणची संस्कृती जपत मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणात निखिलन शेअर केलेल्या या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतल आहे. होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नव्हे तर होळी म्हणजे संस्कृती जपणारा सण आहे हे देखील निखिलने या व्हिडीओमधून अधोरेखित केल आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. निखिलच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actorNikhil Bane Holi Special Videonikhil bane video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Priya Bapat On Preganancy

"बाळ असेल तरंच…", लग्नाच्या १३ वर्षांनंतरही बाळ न होण्याबाबत प्रिया बापटचं स्पष्टीकरण, म्हणाली, "मुलं नको आहेत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.