शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नम्रता संभेरावचं लेकाबरोबर आहे खास बॉण्डिंग, रुद्राजसाठी अंगाई गाताना दिसली अन्…; व्हिडीओला चाहत्यांची पसंती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao Son

नम्रता संभेरावचं लेकाबरोबर आहे खास बॉण्डिंग, रुद्राजसाठी अंगाई गाताना दिसली अन्…; व्हिडीओला चाहत्यांची पसंती

कलाकार मंडळी आणि त्यांच्या मुलांचे नेहमीच खास बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो नेहमी शेअर करताना दिसते. बरेचदा चाहते मंडळी या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. तर कलाकार मंडळीही चाहत्यांच्या कुटुंबाबरोबरचे, मुलांबरोबरचे अनेक आनंदाचे क्षण शेअर करताना दिसतात. अशातच सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Namrata Sambherao Son)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. कलाकारांच्या अफलातून टायमिंगचे देखील चाहते आहेत. शिवाय हास्यजत्रेच्या कथानकाने प्रेक्षकांना वेड करुन सोडलं आहे. या कार्यक्रमातून आजवर अनेक कलाकार घराघरात पोहोचले. प्रत्येक कलाकाराचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमधून अभिनेत्री नम्रता संभेराव चर्चेत आली. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती लोकप्रियतेस आली. या कार्यक्रमानंतर नम्रताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांकडून शाबासकीची थाप मिळवली.

आणखी वाचा – पारूच्याही मनात अहिल्यादेवींविषयी राग, दिशाची बाजू घेत फटकारलं अन्…; किर्लोस्कर घरातून कायमची बाहेर पडणार का?

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

नम्रता तिचा लेकी रुद्राज बरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर करताना दिसते आणि ज्याची नेहमी चर्चा होत असते. आताही तिने तिच्या लेकाचा शेअर केलेला एक छान असा व्हिडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नम्रता व रुद्रज हे दोघे अंगाई गाताना दिसत आहेत. रुद्राजला नम्रता झोपवताना दिसत आहे आणि त्याला झोप येत नाही आहे म्हणून ती लिंबोणीच्या झाडामागे ही अंगाई गाताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘पारू’मधील दामिनी खऱ्या आयुष्यात कशी?, सेलिब्रिटी असूनही राहते इतकी साधी, फोटोंनी वेधलं लक्ष

ही अंगाई रुद्राजलाही पाठ असलेली पाहायला मिळत आहे. झोप येत आहे तरीसुद्धा रुद्राज ती अंगाई गाताना दिसत आहे. या व्हिडीओला नम्रताने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “झोप येतेय तरी गाणं म्हणायचं आहे माझ निरागस बाळ. रुद्राजला अंगाई आवडते आणि त्याला पाठदेखील आहे”, असं म्हटलं आहे. नम्रता व रुद्राजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शिविली आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actressnamrata sambheraoNamrata Sambherao Son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sangram Salvi On Khushboo Tawde

"ऑनस्क्रीन मिठी मारताना पाहिलं आणि मी उठून गेलो", संग्राम साळवीने बायको खुशबू तावडेचा सांगितला मालिकेदरम्यानचा एक किस्सा, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.