रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बॉईज ४’चं पोस्टर्स प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हे’ दोन कलाकार झळकणार, समीर चौघुले म्हणाले, “भावा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 20, 2023 | 2:26 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Gaurav More and Nikhil Bane in Boyz 4

'बॉईज ४'चं पोस्टर्स प्रदर्शित, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'हे' दोन कलाकार झळकणार, समीर चौघुले म्हणाले, "भावा…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोटया पडद्यावरील कार्यक्रम अनेकांच्या घरात नेहमी पहिला जातो. विनोदी स्किट्स, त्याचे दमदार सादरीकरण व कलाकारांचा विनोदी अभिनय यांमुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय असून या कार्यक्रमाबरोबरच त्यातील कलाकारांचे चाहते दिवाने झाले आहेत. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांसारखे अनुभवी कलाकारांसह नव्या दमाचे कलाकारही प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवत आहे. याच कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार आज चित्रपटांमध्ये झळकत असून हास्यजत्रेतील दोन दमदार हास्यवीर गौरव मोरे आणि निखिल बने लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. (Gaurav More and Nikhil Bane in Boyz 4)

विशाल सखाराम देवरुखकर यांच्या ‘बॉईज’ फ्रॅन्चायझीमधील चौथा भाग ‘बॉईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, ऋतुजा शिंदे, जुई बेंडखळे यांच्यासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार गौरव मोरे व निखिल बने देखील झळकणार आहेत. नुकतंच चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये हे सर्व कलाकार दिसत आहे.

‘बॉईज ४’ चित्रपटातून अभिनेता निखिल बने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. दरम्यान, गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निखिलचा चित्रपटातील पोस्टर शेअर केला आहे. ज्यात त्याने म्हटलंय, “बने, आपण आहोत रे Boyz4 मध्ये! ही दोस्ती तुटायची नाय!” गौरवच्या या पोस्टवर हास्यजत्रेतील कलाकारांनी कमेंटद्वारे निखिलचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, व्हिडीओ होतोय सर्वत्र वायरल

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

अभिनेत्री सई ताम्हणकरने “Woooooo! आज तो आईसा दिन बने !!”, अशी कमेंट केली आहे. तर हास्यजत्रेतील सहकलाकार समीर चौघुलेने या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय, “ये बने..ये हुई न बात….खूप खूप मस्त वाटल भावा”. प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, श्याम राजपूत या हास्यजत्रेतील सहकलाकारांसह अन्य कलाकार व नेटकऱ्यांनी कमेंट करत गौरव व निखिलचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर गणरायासाठी बनवला नयनरम्य देखावा, मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “माझं भाग्य की…”

View this post on Instagram

A post shared by Boyz 4- बॉईज ४ (@boyz4thefilm)

सध्या गौरवकडे ‘बॉईज ४’ व्यतिरिक्त ‘अंकुश’, ‘महापरिनिर्वाण’, ‘लंडन मिसळ’, ‘संगी’ या मराठी व हिंदी चित्रपटांची रांग आहे. तर ‘बॉईज ४’ हा निखिलचा पहिलाच चित्रपट आहे. येत्या २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

Tags: boyz 4 moviegaurav moreGaurav More and Nikhil Bane in Boyz 4nikhil baneupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Netizens comment on Sonalee Kulkarni Post

"तुझे पती कुठे आहे?" सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवर नेटकऱ्याने विचारला प्रश्न, उत्तर देत म्हणाली, "तो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.