गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी सदस्यांशी जुळवून…”, सोनाली राऊतची घरातून एक्झिट, बाहेर पडताच म्हणाली, “माझ्याकडून खूप अपेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 2, 2026 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonali Raut Eliminate

"मी सदस्यांशी जुळवून…", सोनाली राऊतची घरातून एक्झिट, बाहेर पडताच म्हणाली, "माझ्याकडून खूप अपेक्षा…"

Sonali Raut Eliminate : ‘बिग बॉस’ मराठी सिझनचे सहावे पर्व सध्या तुफान व्हायरल होत आहे. यंदाच्या पर्वातील सगळ्याच स्पर्धकांनी अगदी पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या पर्वातून सगळ्यात पहिली घराबाहेर पडणारी स्पर्धक म्हणजे राधा पाटील. यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरातून दुसरी स्पर्धक बाहेर आली आहे. दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, सोनाली राऊत ओमकार राऊत आणि रुचिता जामदार या आठ जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. यापैकी सोनाली राऊतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट घेतली आहे.

व्होटिंगनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत हे दोन स्पर्धक एलिमेशनच्या शेवटच्या राउंडमध्ये होते. या दोन राऊतपैकी एका राऊतचा पराभव नक्की होता. यांत सोनाली राऊत मागे पडली आणि ती घराबाहेर पडली. अवघ्या तीन आठवड्यांत सोनालीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. दोन दिवसांपासून सोनाली राऊतची एक्झिट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

आणखी वाचा – “आमचं रिलेशनशिपच टॉक्सिक झालं”, प्रियदर्शिनी इंदलकर रिलेशनबाबत स्पष्टच बोलली, म्हणाली, “लवकर लग्न…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सोनालीच्या एक्झिटनंतर ती जेव्हा घराबाहेर आली तेव्हा तिने रितेश देशमुखसह संवाद साधला. सोनाली एवढ्या लवकर घराबाहेर पडेल असं कोणालाही अजिबात वाटलं नव्हतं. यावेळी सोनाली म्हणाली, “मला असं वाटतं सर्वांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्या मी पूर्ण करु शकले नाही. जेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात मी गेले तेव्हा सगळ्या गोष्टी मला नवीन वाटल्या. घरातील अन्य सदस्यांशी मी इतकं छान जुळवून घेऊ शकले नाही”.

आणखी वाचा – हॉलिवूडला मोठा धक्का! ‘शिट्स क्रीक’ फेम अभिनेत्रीचे ७१व्या वर्षी निधन, तब्येत अचानक बिघडली आणि…

‘बिग बॉस’च्या घरात आता १५ स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे हे १५ जण ‘बिग बॉस’च्या घरात काय गोंधळ घालणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे. इतकंच नाहीतर आता हे १५ स्पर्धक अलर्ट राहून खेळणार असं स्पष्ट दिसू लागलं आहे.

Tags: bigg boss marathientertainmentSonali Raut
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Rohit Shetty Firing Case Update

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक, एक हल्लेखोर गोळीबार करताना दिसला; CCTV फुटेज समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.