कोणाच्याही आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे वडील. कोणत्याही परिस्थतीत आपल्या मुलांच्या पाठी उभं राहण्याचं सामर्थ्य वडिलांमध्ये असत. आपल्या मागून वडिलांचा आधार निघून जण कोणत्याही पाल्यासाठी दुःख दायक असत. आयुष्यतील असाच कभीर आधार हरपला आहे तो अभिनेता आयुष्मान खुराणाच्या आयुष्यातून.(Ayushmann Khurrana Father Death)
१९ मे च्या संध्याकाळी ही दुःखद बातमी खुराणा कुटूंबियांच्या कानावर पडली आणि एकच शोककळा पसरली. आयुष्मान चे वडील पी खुराणा हे मागील काही दिवसांपासून हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. शर्तीच्या प्रयत्नानंतर देखील डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि काळ अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित पी खुराणा हे लोकप्रिय ज्योतिषतज्ञ होते. ज्योतिषशास्त्रातील अनेक पुस्तकांसाठी देखील ते ओळखले जात होते.

आयुष्यमान खुराणा हा मनोरंजन सृष्टीतील एक लोप्रिय अभिनेता असून अनेक वेब सिरीज, चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या आयुष्यात या कधी हि भरून न निघणाऱ्या पोकळीसाठी चाहत्यांनी त्याला धीर दिला आहे.(Ayushmann Khurrana Father Death)