Maharashtra Budget 2025 : प्रत्येक महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार… राज्यभरात एकच विषय सुरु झाला आणि महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. निवडणूकांपूर्वी सुरु झालेली ही योजना सत्यात उतरणार का? हाही प्रश्न होता. अखेरीस राज्यभरातील महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले… मग किती तो जल्लोष, आनंद… आमच्या राज्यभरातील साध्या बहिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला. राजयकीय मंडळींनी तर मतदानासाठी तिच बाजू उचलून धरली. मग रक्षाबंधन, भाऊबीज सणांमध्ये लाडक्या बहिणींची चांदीच झाली. इतकं सगळं सुरु असताना आयुष्यभर ही योजना महिलांना पुरेशी पडणार का? हा प्रश्न होताच. आता याच प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर मिळालं आहे. लाडकी बहिणी योजनेने अचानक घेतलेला युटर्न चर्चेचा विषय ठरत आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यात १५०० रुपये दर महिना येत होते. ही रक्कम वाढवून २१०० रुपये खात्यात येणार असल्याची बरीच चर्चा होती. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यंदाच्या महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५ मध्ये लाडकी बहिणीच्या या वाढीव रकमेचा साधा उल्लेखही नाही. म्हणजेच हा समोर आलेला अर्थसंकल्प महिलांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय आणि धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे का?, हा प्रश्न आहेच.
निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील समस्त महिलावर्गाचा विश्वासघात केला आहे. या लाडक्या बहिणींची निराशा झाली असं म्हणायला हवं. इतकंच नाहीतर जवळपास १० लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळून टाकलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात आले आणि त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये आजवर खर्च झाले. तर २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
आणखी वाचा – ३७व्या वर्षीही ‘तारक मेहता…’मधील बबिता अविवाहित, अजूनही लग्न केलं नाही कारण…
या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला. अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याचे सरकारने निश्चित केले आहे. होतकरु, व्यवसाय करु पाहणाऱ्या महिलांसाठी ही सूवर्ण संधीच असेल. मात्र पैसे वाढवून देतो म्हटल्यानंतर युर्टन घेणं अनेकांना खटकलं. मग लाडकी बहीण योजना फक्त मतदान, निवडणूकांसाठीच होती का? असाही प्रश्न अनुउत्तरित राहतो…