Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Promo : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या कॉमेडी शोने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कित्येक लोकांना तर हा शो पाहिल्याशिवाय घासही उतरत नाही. दयाबेन या शोमधून गेली असली तरी ही मालिका आजही सुरळीत सुरु आहे. या शोमधील पात्रांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्या या शोमध्ये सोनूच्या लग्नाचा ट्रक सुरु असलेला पाहायला मिळाला. तर या शोमध्ये टपू आणि सोनूचा लग्नाचा ट्रॅक सुरु असल्याचं समोर आलं. ज्यामध्ये तो घराबाहेर पळताना आणि मंदिरात लग्न करताना दिसला. इतकेच नव्हे तर लग्नानंतर, दोघांनीही एकमेकांबरोबर सेल्फी घेतली आणि आता त्यांचे लग्न झाल्याची घोषणा करतानाही ते दिसले.
सोनू आणि टपूच्या लग्नाने भिडे आणि जेठालाल कोणत्या धक्क्यात असणार हे पाहणं रंजक ठरेल. वास्तविक, शोच्या अलीकडील भागात असे दिसून आले की, टपू आणि सोनू घरातून पळून गेले आहेत आणि त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोघांच्या कुटुंबाला त्यांच्या घोटाळ्याची कुणकुण लागताच ते दोघांना शोधण्यासाठी बाहेर जातात. मग टपू फुलांच्या दुकानातून वरमाला घेतो आणि ऑनलाईन पेमेंट करतो आणि पेमेंट कट झाल्याचा संदेश जेठालालच्या फोनमध्ये येतो. यामुळे टपू आणि सोनू यांच्या कुटुंबीयांना ते दोघे कुठे आहेत याचा शोध लागतो.
आणखी वाचा – Video : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ, चाहती फोटो काढायला येताच केलं लिप किस, नेटकऱ्यांचा संताप
यानंतर, सोनूचे वडील आत्माराम भिडे आणि टपूचे वडील जेठालाल त्या फुलांच्या दुकानात पोहोचतात. जिथे तो दुकानदार सांगतो की, त्या मुलाने लग्नासाठी वरमाला घेतली. हे ऐकून, दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि हे लग्न थांबवण्यासाठी ते मंदिराच्या दिशेने धावतात. मग नवरा-नवरीच्या वेशात टप्पू आणि सोनूला पाहून दोघांना खूप मोठा शॉक बसतो. यानंतर, टप्पूने त्यांचे लग्न झाले असल्याचे स्पष्ट करतो.
मालिकेत आता हे अद्याप उघड झाले नाही की टप्पू आणि सोनू यांनी खरोखर लग्न केले आहे की टीआरपीसाठी निर्मात्यांनी मालिकेत मोठा ट्विस्ट आणला आहे. हे आज उघडकीस होणार आहे. ज्याचे चाहतेही उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत.