शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाकुंभमधील व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, राजकुमार रावच्या भावाबरोबर साकारणार भूमिका

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2025 | 10:22 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mahakumbh 2025 viral girl Monalisa movie

महाकुंभ २०२५ची व्हायरल गर्ल मोनालिसा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार, जाणून घ्या...

सोशल मीडियाच्या या काळात कोणतीही व्यक्ती कधीही व्हायरल होऊ शकते. अशीच एक व्हायरल झालेली महाकुंभमधील सावळ्या रंगाची, सुंदर डोळ्यांची मुलगी म्हणजे मोनालीसा. सध्या महाकुंभ २०२५ची व्हायरल गर्ल मोनालिसा सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनमोहक हास्यामुळे व्हायरल झालेली मोनालिसा आता तिच्या घरी म्हणजेच मध्य प्रदेशातील महेश्वरला परतली आहे. ती संपूर्ण महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये राहून रुद्राक्ष जपमाळ विकणार होती पण १५ दिवसांतच तिला महाकुंभ सोडावा लागला. अशातच तिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ती लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. (Mahakumbh 2025 viral girl Monalisa movie)

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मोनालिसाला घेतलं आहे. सनोज मिश्रा मोनालिसाच्या गावी गेले होते, जिथे मोनालिसाने त्यांची भेट घेऊन चित्रपट साइन केला. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तिला मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महाकुंभमध्ये इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे सोनज मिश्रा यांनी मोनालिसाला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – रेश्माबरोबरचा गैरमसज दूर होताच केवडा आभ्याच्या घरी जाणार, नात्यामध्ये नवं वळण

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून बॉलिवूड स्टार राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित रावही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे मोनालिसा ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित रावबरोबर काम करणार आहे. त्यामुळे राजकुमार रावच्या भावासह मोनालिसाला चित्रपटात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतील ही नक्की.

आणखी वाचा – हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती

दरम्यान, सनोज मिश्रा समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा ‘काशी टू काश्मीर’ चित्रपट असो किंवा ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’, त्यांच्या चित्रपटाला खूप विरोध झाला होता. त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पण त्याची पर्वा न करता सनोज मिश्राने हा चित्रपट प्रदर्शित केला आणि लोकांना तो खूप आवडला.  

Tags: Mahakumbh 2025 viral girl Monalisa movieviral girl Monalisa in The Diary of Manipur movieviral girl Monalisa movie with Rajkumar Rao brother
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mahira Sharma Dating Rumors

'बिग बॉस' फेम अभिनेत्री करतेय 'या' सुप्रसिद्ध क्रिकेटरला डेट, रोमँटिक फोटो समोर येताच चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.