धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या नृत्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. माधुरीने तिच्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही माधुरी नेहमीच काही ना काही शेअर करून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अशातच माधुरीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Madhuri Dixit Karisma kapoor)
माधुरी दीक्षित आणि अभिनेत्री करिश्मा कपूर या एकाच गाण्यावर थिरकलेल्या पाहायला मिळत आहेत. 80-90 च्या दशकात या जोडीने बॉलिवूडवर राज्य केले. करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी आमच्यावर एक मिनी डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे, “Dance of Envy Friendship” असं कॅप्शन देत ये जवानी है दिवानी चित्रपटातील बलम पिचकारी या गाण्यावर माधुरी आणि करिष्मा यांनी ठेका धरला आहे. तसेच एकमेकींना मिठी मारलेला फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
माधुरी आणि करिष्माचा हा धमाल डान्स व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.instagram.com/p/Cs5oZXDrjwK/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

माधुरी आणि करिश्मा या दोघी1997 सालच्या रोमँटिक म्युझिकल दिल तो पागल है मध्ये कास्ट झाल्या आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. माधुरीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या आणि कलाकारांच्या कमेंट्स आल्या आहेत. करिश्माची बहीण करीना कपूरने लकरत लिहिलं आहे की, “द ओजी सुपरस्टार्स.” भूमी पेडणेकर हीने कमेंट करत लिहिलंय, ‘आयकॉन्स’. मुक्ती मोहन यांनी “ओजी डान्सिंग सुपरस्टार्स” असं लिहिल आहे.(Madhuri Dixit Karisma kapoor)
तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय, “आवडते OGs.” “लोलो आणि धक धक ओएमजी.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलंय, “शाहरुख की कमी है बस (केवळ शाहरुख गायब आहे). त्यांना एकत्र पाहणे खूप छान.” ñया शिवाय अभिनेते संजय कपूर, चित्रांगदा सिंग, राशि खन्ना आणि इतर कलाकारांनी देखील या व्हिडीओखली कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केली आहे.