मनोरंजन क्षेत्रात अविभाज्य घटक असणारा भाग म्हणजे मालिका. टेलिव्हिजनवर दररोज न चुकता लागणाऱ्या या मालिकांचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील कथानक आणि कलाकार यांच्यावर प्रेक्षक विशेष लक्ष ठेवून असतात. पडद्यावर दिसणारे कलाकार पडद्यामागे कशी रंगत आणतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असत. अशातच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेप्रमाणे मालिकेतील कलाकार ही नेहमीच चर्चेत असतात. मालिकेत आलेल्या कथानकाच्या रंजक वळणामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील कलाकार पडद्यावर दिसण्याआधी पडद्यामागे कशी रंगत आणतात हे पाहणं नेहमीच प्रेक्षकांना उत्सुकतेचं असत.(Reshma Shinde Vidisha Mhaskar)
रंग माझा वेगळा मालिकेतील आयेशा म्हणजेच विदिशा म्हसकर ही नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणारी आयेशा पडद्यामागे मात्र सगळ्यांची कस वागते याची झलक तिने शेअर केलेल्या व्हिडीओवरून येतेय. पडद्यावर एकमेकांच्या विरोधात असणारे हे कलाकार पडद्यामागे मात्र किती चांगले आहेत हे पाहणं नेहमीच रंजक ठरत. विदिशाने मेकअपरूममधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विदिशा रेश्माची फिरकी घेताना दिसतेय. रेश्माला तयार करायला तीन चार लोक एकत्र काम करतायत यावरून विदिशा रेश्माची मस्करी करताना दिसतेय.
विदिशाने सांगितलं रेश्माच सिक्रेट (Reshma Shinde Vidisha Mhaskar)
तीन तीन माणसं कामाला खूप पैसा असं म्हणून ती रेश्माला चिडवतेय. विदिशा आणि रेश्माचा मज्जा मस्ती करतानाच्या या व्हिडीओमध्ये विदिशा रेश्माला चिडवतेय. रेश्माला शूटला पोचायला उशीर झाल्याचं दिसतंय, आणि म्हणून तिला तयार करायला चार लोक एकत्र आलेत, यावरून विदिशा रेश्माला चिडवतेय की तुझ्याकडे खूप पैसे आहे म्हणून तू चार चार लोक काम करायला घेतली आहेत. यावर रेश्मा असं काही नसल्याचं सांगतेय, आणि जोरजोरात हसताना दिसतेय.(Reshma Shinde Vidisha Mhaskar)
विदिशाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर ह्याला म्हणतात फेम भाई असं कॅप्शन देत रेश्माला टॅग करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. रंग माझा वेगळा मालिकेतील सगळेच कलाकार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. या मालिकेत आलेल्या रंजक कथेमुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. मालिकेत कार्तिकची जेल मधून सुटका झालेली पाहायला मिळतेय. तर कार्तिक जेलमध्ये गेल्याचा आरोप कार्तिकी दीपावर लावते त्यामुळे कार्तिकी दीपासोबत बोलत नाही.