महाराष्ट्राचा पहाडी आवाज म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप. लोकशाहीर विठ्ठल उमप आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल उमप यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला विठ्ठल उमप यांचं निधन झालं आहे. काल दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने त्यांचं दुःखद निधन झाले. वत्सला यांच्या जाण्याने उमप कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येईल. (lokshahir vitthal umap wife death)
शाहीर विठ्ठल उमप यांचा आवाज दैवी आहे. विठ्ठल उमप यांनी सबंध महाराष्ट्र तर गाजवलाच मात्र देशी-विदेशीही आपल्या शाहिरीचा डंका पिटला. लोकशाहीर विठ्ठल उमप यांना ओळखत नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. विठ्ठल उमप आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी, नाटक व आठवणी आजही मराठी मनावर रुंजी घालत आहेत. विठ्ठल उमप यांच्या निधनानंतर आता त्यांची पत्नी वत्सला यांचंही अल्पशा आजाराने निधन झालं असल्याचं समोर आलं आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला या कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप याच्या आईच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वत्सला व विठ्ठल उमप यांनी गरिबीत दिवस काढत, स्वतःचा विचार न करता त्यांच्या मुलांना वाढवलं. वत्सला या नायगाव मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीत राहून खानावळ चालवत होत्या, शिवाय त्या भाजी विकण्याचाही व्यवसाय करत, याबाबत नंदेशने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.