Reduce or Stop Hair Fall : केस गळतीच्या प्रॉब्लेमने आजकाल प्रत्येकजण त्रस्त आहे. कंगवा फिरवला की केस हातात, अंघोळ करताना केस बाथरूममध्ये आणि झोपताना उशीवरसुद्धा केस. असं आजकाल सर्रास होताना दिसत आहे आणि अर्थात यामुळे मनात एकच भीती आहे की आपण टकले तर नाही होणार ना?. आजकाल सगळ्यांना हा प्रॉब्लेम होतं आहे. स्ट्रेस, पॅल्युशन, चुकीचा आहार, उशिरा झोपणं- यामुळे केस गळती प्रचंड वाढली आहे. आपण महागडे शाम्पू, हेअर ऑइल, ट्रीटमेंट आणि सलूनमध्ये हजारो पैसे खर्च करतो. पण खरं सांगायचं तर हे पर्मनंट सोल्युशन नसतं.
पण एक भन्नाट घरघुती उपाय ज्याने केस गळती कमी होते, केस मजबूत होतात आणि स्काल्पला फ्रेश फील मिळतो. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे या साठी लागणार आहेत फक्त दोन गोष्टी कोरफड आणि कडीपत्ता पावडर. कोरफडमुळे आपल्या केसांना थंडावा मिळतो. Moisture आणि पोषण. यातले enzymes scalp स्वच्छ ठेवतात आणि नवीन केस वाढण्यास मदत करतात. दुसरी लागणारी गोष्ट म्हणजे कडीपत्ता पावडर. जो कडीपत्ता आपल्याला स्वयंपाक घरात मिळतो. यात असतात व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स जे केस मजबूत करतात, केस अकाली सफेद होण्यापासून थांबवतात आणि केसांच्या मुळांना पोषण देतात.
एका बाउलमध्ये २ चमचे कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा कडीपत्ता पावडर टाका आणि दोन्ही एकत्र करुन त्याची एक पेस्ट बनवा. आणि पूर्ण केसांना लावून मुळापर्यंत मसाज करा. हा पॅक तुम्ही ३० ते ४० मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर हलक्या शॅम्पूने केस धुवा. ही सिंपल ट्रीटमेंट किमान आठवड्यातून एकदा केल्यास तुम्हाला याचा फरक जाणवेल.
याने केस मजबूत, सिल्की होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याने हेअर फॉल कमी होईल. सततच्या केसगळतीला रामराम करण्यासाठी हे साधे, सोप्पे घरगुती उपाय नक्की करुन पाहा.





