शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई होण्यासाठी PCOD आड येतंय?, PCOD/PCOS च्या ‘या’ समस्येतून बाहेर पडायचं असेल तर काय कराल?, जाणून घ्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 12, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
PCOD PCOS problems

आई होण्यासाठी PCOD आड येतंय?, PCOD/PCOS च्या 'या' समस्येतून बाहेर पडायचं असेल तर काय कराल?, जाणून घ्या…

PCOD PCOS problems : Pcod आणि pcos बद्दल आजकाल सर्रासपणे ऐकायला मिळत आहे. सध्या स्त्री वर्गात याचं प्रमाण वाढत चाललंय पण हे असं का होतंय किंवा याची लक्षणे काय आहेत याबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. PCOD म्हणजे Polycystic Ovarian Disease, आणि PCOS म्हणजे Polycystic Ovary Syndrome.
या दोन्ही स्थितींमध्ये स्त्रीच्या अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात. यामुळे शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे विशेषतः पुरुष हार्मोन म्हणजेच अँड्रोजेन्स वाढतात. या हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात.

या बदलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे किंवा थांबणे, चेहऱ्यावर, हात-पायांवर जास्त केस येणे,मुरुमं आणि त्वचेवर तेलकटपणा, केस गळणे किंवा टक्कल पडणे,वजन वाढणे, विशेषतः पोटाभोवती थकवा, चिडचिड, मूड स्विंग्स त्याचबरोबर गर्भधारणेस अडथळा निर्माण होतो. तर असे बरेच लक्षणे दिसून येतात पण यासंबंधित स्त्रीतज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.त्याचबरोबर काही चांगल्या सवयीही लावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

आणखी वाचा – मासिक पाळीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?, डॉक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “साध्या कारणांसाठी…”

फायबरयुक्त संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, मेडिटेशन करणंही तितकंच गरजेचं आहे पण याचबरोबर याची योग्य ती औषधेपण घ्यायला हवीत. बऱ्याच जणांचं असं मत आहे की, एखाद्या स्त्रीला pcod किंवा pcos असेल तर तिला भविष्यात गरोदरपणात अडथळे येतात किंवा तिला बाळ होऊच शकत नाही पण हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे.

आणखी वाचा – “प्रेमात होते म्हणून विचार न करताच लग्न केलं”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, “मी विश्वास ठेवला तीच व्यक्ती…”

ही एक वैद्यकीय अडचण आहे पण योग्य उपचारांनी यावर मातही करता येते. महत्त्वाचं म्हणजे, ही गोष्ट लपवू नका, लाजू नका आणि हा प्रॉब्लेम होणाऱ्या मुलींना, महिलांना आधार देणंही गरजेचं आणि आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे. PCOD / PCOS ही सामान्य पण गंभीर आरोग्यसमस्या आहे. याबद्दल माहिती असणं, वेळेवर निदान होणं,आणि योग्य उपचार घेणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे.

Tags: lifestyle newsPCOD PCOSwomen health
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
 Kajol breaks silence on breaking no kissing policy
Entertainment

“मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

एप्रिल 24, 2026 | 10:13 am
Next Post
Reduce or Stop Hair Fall

सततच्या केसगळतीला त्रासले आहात का?, हे सोप्पे घरगुती उपाय करतील 'या' त्रासातून मुक्त, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.