आवडत्या कलाकारांच्या लाडक्या जोड्या आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ, अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगांकर या जोड्यां प्रमाणेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची जोडी सुद्दा चांगलीच लोकप्रिय आहे.(Laxmikant Berde First Wife)
पण दुर्दैवाने सगळ्यांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या आवडीच्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे हे व्यक्तिमत्व किती प्रेमळ होत या संदर्भात एक प्रेमळ आणि तेवढीच दुःखद घटना सांगितली जाते. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचं लग्न होण्या आधी लक्ष्मीकांत यांचं पहिलं लग्न अभिनेत्री रुही यांच्या सोबत झालं होत.

रुहीच्या येण्यानं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं लक्ष्मी आल्याचं म्हणलं जात. असं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये देखील सांगितलं आहे. पण जेव्हा रुही यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलेल्या एका भावनिक कृत्याची आठवण नेहमी करून दिली जाते.
लक्ष्या मामांचा तो भावुक निर्णय..(Laxmikant Berde First Wife)
रुही यांच्या जाण्याने लक्ष्मीकांत यांच्या मनावर मोठा आघात झाला होता. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं कि रुहीच जाणं हे माझ्या आयुष्यातील कधी ही भरून न निघणारी कमी आहे. रुही यांच्या अंत्यसंस्कारा वेळी त्यांच्या अंगावरील कोणताही दागिना न काढता त्यांनां अग्नी देण्याचा निर्णय लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतला होता.(Laxmikant Berde First Wife)
आणि हा निर्णय ऐकून सर्वांचे डोळे पाणावले होते. अशोक सराफ, महेश कोठारे आणि अनेक मित्रांनी लक्ष्मीकांत यांना धीर दिला. त्त्यानंतर तब्बल 3 महिने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कोणतीही मुलाखत दिली नाही. यावरून या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर झालेल्या आघाताची कल्पना येते.