Chhaava Box Office Collection : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. २०२५ या वर्षाला दमदार सुरुवात देणाऱ्या विकी कौशलच्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत प्रचंड कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने किती कमाई केली याबाबत जाणून घ्यायला सारे उत्सुक आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विकी कौशलच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई करून यावर्षीची चांगली सुरुवात केली होती, तर शनिवारी या चित्रपटाने सुमारे ३७ कोटी रुपये कमावले. आता, या चित्रपटाने रविवारी सर्वोत्तम कलेक्शन जमा केले असल्याचं समोर आल आहे.
रविवारी छावा चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा ५० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला. या चित्रपटाने आतापर्यंत ४८.५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत ११७.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर अक्षय कुमारच्या ‘छावा’ चित्रपटाने सुमारे २३ दिवसांत थिएटरमध्ये ११६.५ कोटी रुपये कमावले होते. ‘छावा’ चे बजेट सुमारे १३० कोटी रुपये होते. सोमवारपर्यंत हा चित्रपट बजेटच्या जवळपास पोहोचू शकेल असा विश्वास आहे. जगभरातील चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर, ‘छावा’ ने फक्त दोन दिवसांत १००.०० कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. आता आकडेवारी पाहता, चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात सुमारे १६० कोटी रुपये कमावले असतील अशी अपेक्षा आहे.
आणखी वाचा – राजेशाही एन्ट्री, कोकणी संस्कृतीचं दर्शन ते अवाढव्य खर्च; असं झालं अंकिता वालावलकरचं लग्न, व्हिडीओ व्हायरल
या चित्रपटात विकी कौशल एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे आणि तो त्याचे धाडस दाखवताना दिसत आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आणखी वाचा – लग्नात चेहराच जळाला, ढसाढसा रडली अन्…; पारूने सांगितली तिच्या लग्नातील सत्य घटना, वाईट वेळ आली पण…
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ‘छावा’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. आधी डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण नंतर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत.