Ankita Walawalkar Car Accident : एकीकडे लगीन घाई सुरू असताना अचानक समोर आलेल्या धक्कादायक प्रकाराने कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला खूप मोठा फटका बसला आहे. साखरपुडा समारंभ झाल्यानंतर त्याच रात्री अंकिताच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे समोर आलं. इंस्टाग्राम पोस्टवर स्टोरी शेअर करत अंकिताने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. या अपघातात गाडीचं नुकसान झालं असल्याचं दिसत असलं तरी अंकिता व कुणाल हे सुखरूप असल्याचे समोर आलं. अंकिताची ही स्टोरी पाहून तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अंकिता वालावलकर लग्नानिमित्त सध्या कोकणात आहे. नुकताच अंकिताचा साखरपुडा समारंभ पार पडला तसेच मेहंदी समारंभही थाटामाटात पार पडल्याचं समोर आल आणि साखरपुड्याच्या रात्री तिच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी अंकिताने स्टोरी पोस्ट करत दिली. तर दोघंही सुखरूप असल्याचे समोर आले. अंकिता व कुणाल कोकणात असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार, कुटुंबिय यांच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने आलिशान कार खरेदी केली होती आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.

अंकिताने सोशल मीडियावर ‘ती येतेय’, ‘ती आलीये… वाट बघतेय’ अशा पोस्ट शेअर करत तिच्या सगळ्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. अंकिता नेमकं काय सरप्राइज देणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली. अंकिता वालावलकरने ऑडी ही आलिशान गाडी खरेदी केली.
गाडीचा पहिला फोटो शेअर करत ‘कोकण हार्टेड गर्लची‘आवडी आली’ असं कॅप्शन तिने दिल होतं. अंकिताच्या आनंदाच्या क्षणी तिच्या याच गाडीचा अपघात झाला आहे ही फार वाईट बातमी कानावर आली. आता लवकरच अंकिता व कुणाल बोहल्यावर चढणार आहेत. मेहंदी, साखरपुडा समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता त्यांच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.