मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अशातच नुकतीच ‘लता दीनानाथ मंगेशकर २०२४’ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराचे मानकरी बिग बी अमिताभ बच्चन ठरले आहेत. तर दिग्गज संगीतकार-गायक ए. आर. रहमान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
२०२२ साली या पुरस्कारची घोषणा करण्यात आली असून २०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. अंतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२४ हे या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. तर दुसऱ्या वर्षी हा मान आशा भोसले यांना मिळाला होता. आता बिग बी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत असून ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली आहे आणि याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन (दि.२४) एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात.
यंदाचा हा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा २४ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी हा सोहळा होईल. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले याठिकाणी होणार आहे.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा : ए. आर. रेहमान
मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार : अशोक सराफ
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार : अतुल परचुरे
मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार : रणदीप हुडा