Akshay Kumar Fitness Secret : कलाकार मंडळी म्हटलं की फिटनेस हा आलाच. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनयाबरोबरच फिटनेसकडे विशेष प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं. या फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव आवर्जून घेतलं जातं. फिटनेसच्या अक्षय कुमारचे नाव जवळजवळ नेहमीच प्रथम येते. त्याच्या अविश्वसनीय शिस्तीसाठी तो नेहमीच ओळखला जातो. त्याने आपली जीवनशैली शॉर्टकटपेक्षा सातत्यपूर्ण बनवली आहे. व्यायाम, आहार, फिटनेस याबाबत अनेकदा बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने भाष्य केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा अभिनेत्याने डाएटबद्दल केलेलं महत्त्व लक्षवेधी ठरत आहे.
अभिनेत्याने नुकतीच ‘युवर बॉडी ऑलरेडी नोज’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याने डाएटबद्दल सांगितले. अक्षय कुमार म्हणाला, “सायंकाळी लवकर जेवण करणे गरजेचे आहे. ते तुमच्या शरीरासाठी गरजेचे असते, कारण जेव्हा आपण रात्री झोपण्यासाठी जातो, त्यावेळी आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव म्हणजेच डोळे, हात, पाय आराम करत असतात. पण, फक्त आपले पोट आराम करु शकत नाही, कारण आपण उशिरा जेवलेलो असतो. उशिरा जेवल्यामुळे असे होते की जेव्हा तुम्ही उठता, त्यावेळी पोटाच्या आरामाची वेळ होते. पण, आपण उठल्यानंतर लगेच नाश्ता करतो आणि बिचाऱ्या पोटाला पुन्हा काम करावे लागते”.
पुढे तो म्हणाला, “मी हे खूप सोप्या पद्धतीने स्पष्ट करत आहे. तुम्हा सगळ्यांनाच हे माहीत आहे की सगळे आजार हे पोटापासूनच सुरु होतात. जर तुम्ही वेळेत, लवकर जेवण केले तर आजार तुमच्या आसपासही येणार नाहीत. हेच मीदेखील माझ्या दिनचर्येत पाळतो. त्यामुळे तुम्ही सायंकाळी साडे सहापर्यंत तुमचा आहार घेतला पाहिजे, जेवले पाहिजे. त्यामुळे वेळेत पचन होईल. जेव्हा तुम्ही ९ ते १० च्या दरम्यान झोपण्यास जाल, त्यावेळी तुमचे पोटही आराम करण्यासाठी तयार असेल, ही खूप सोपी गोष्ट आहे”.
आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचं व्यवसायात पदार्पण, स्वानंदीने लाँच केला स्वतःचा ब्रँड, नावही आहे खास
तसेच अक्षय कुमारने असाही खुलासा केला की, दर सोमवारी तो उपवास करतो. अक्षय म्हणाला, “मी रविवारी संध्याकाळी जेवतो, त्यानंतर सोमवारी मी काहीही खात नाही, थेट मंगळवारी सकाळी मी जेवण करतो”. तो कोणत्या पद्धतीचे व्यायाम करतो?, असं विचारताच अक्षय म्हणाला, “मी रॉक क्लायबिंग करतो. मी वजन उचलत नाही. मला विविध खेळ खेळायला आवडतात. जीममध्ये व्यायाम करताना मी वजन उचलत नाही”.





