meghan jadhav wedding : मराठी मालिकाविश्वातील अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी चाहत्यांना सुखद धक्का देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर थेट प्रेमाची कबुली देत अनेकांनी चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे. अशातच थेट साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट करत मराठी मालिकाविश्वातील दोन कलाकारांनी प्रेमाची अधिकृत बातमी दिली. ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव, आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अनुष्का पिंपुटकरने प्रेमाची जाहीर कबुली दिली. नोव्हेंबर महिन्यात मेघन व अनुष्का लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर सध्या मेघन व अनुष्का यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांचं अगदी थाटामाटात केळवण पार पडलं.
मेघन आणि अनुष्काच्या लगीनघाईला आता सुरुवात झाली असून मेघन आणि अनुष्काचं केळवण ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या संपूर्ण टीमनं माजघर या पारंपरिक रेस्टॉरंटमध्ये थाटामाटात केलं. हॉटेलमध्ये केळवण स्पेशल अशी सजावट करण्यात आली होती. केळीच्या पानावर ‘मेघन अनुष्काचे केळवण’ असं सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं. मेघन आणि अनुष्काचं औक्षण करुन त्यांचं स्वागत करण्यात आलं. पुढे, जयंतने मालिकेच्या टीमसोबत अनुष्काची ओळख करुन दिली.
आणखी वाचा – ‘आम्ही दोघी’नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘असंभव’ चित्रपटामधून समोर येणार रहस्यमय कथा
मेघनने होणाऱ्या पत्नीला पहिला घास भरवताना अगदी बॉलीवूड स्टाइल हटके उखाणा घेतल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने उखाणा घेत म्हटलं, “अनुष्का तुझं नाव घेतो… तूच माझी मस्तानी आणि तूच माझी काशी”. यानंतर उपस्थित सर्वांनीच जल्लोष केला. तर अनुष्का सुद्धा मेघनचा उखाणा ऐकून खूप इम्प्रेस झाली आणि तिने ‘ओह माय गॉड’ अशी प्रतिक्रिया दिली. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेची संपूर्ण टीम या केळवणाला उपस्थित होती. हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगांवकर, मिनाक्षी राठोड, निखिल राजेशिर्के, अनुज ठाकरे, महेश फाळके, विनिता शिंदे ही कलाकार कुटुंबीयांची झलक सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – पंकज त्रिपाठीला मातृशोक, वयाच्या ८९ व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, अभिनेता आईजवळच होता आणि…
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला गाण्याच्या स्वरुपात मेघन-अनुष्काची लव्हस्टोरी ऐकायला मिळत आहे.
मनीष रावांची कन्या आज अनुष्का झाली वधू,
जाधवांचा मेघन आला घेऊन प्रीतीचा मधू,
पुण्याहून मुंबईला जुळले एक नाते,
केळवणाची ही धूम सूर नवे गाते…
ती पुण्याची, तो मुंबईचा पण मनं झाली एक,
कामातील भेटीगाठी झाल्या आयुष्याचा टेक,
अनुष्का तू रुपवान, तू तर आहेस सुंदर,
मेघनच्या जीवनाला आला तुझ्यामुळे बहर,
कधी रुसणे, कधी हसणे… कधी सिक्रेट मीटिंग्ज,
खास रिटेक्स नाही आता… हा तर जीवनाचा प्रवास!
दोघांनाही खास शुभेच्छा देणारं हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. मेघन-अनुष्काच्या या केळवण स्पेशल व्हिडीओला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.





