सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Lakshmi Niwas Promo : बदला घेणार! जान्हवीचा रौद्रावतार, जयंतला धमकावत, शिक्षाही दिली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2025 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
lakshmi niwas promo

Lakshmi Niwas Promo : बदला घेणार! जान्हवीचा रौद्रावतार, जयंतला धमकावत, शिक्षाही दिली आणि…

lakshmi niwas promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पण सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेतील जयंत आणि जान्हवीच्या जोडीला प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. या मालिकेत कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेने रसिकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेचं कथानकही नेहमीच काही ना काही ट्विस्ट आणताना दिसतं. मालिकेत जयंत आणि जान्हवी यांचा सुरु असलेला ट्रक फार कमी लोकांना आवडत आहे. कारण मालिका सुरु झाल्यापासून जयंतने जान्हवीचा फक्त छळ केला आहे. जे बऱ्याचदा प्रेक्षकांना खटकलं आहे.

मालिकेत जयंतच्या क्रूर वागणुकीला जान्हवी कशी सामोरे जाणार आणि त्याला ती कसं सुधारणार, त्याला केव्हा अद्दल घडवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आता मालिकेत आलेल्या ट्विस्टनुसार प्रेक्षकांची ही इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे. अर्थात असं काही पाहणंही प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला असून त्यात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.

आणखी वाचा – प्रिया मराठेला जाऊन १३ दिवस…; अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आतापर्यंतच्या कथेत जयंत फक्त जान्हवीला शिक्षा देताना दिसला होता. पण या नव्या प्रोमोमध्ये जान्हवी आता जयंतलाच शिक्षा देणार असल्याचं समोर आलं आहे. प्रोमोमध्ये जान्हवी जयंतला शिक्षा देण्यासाठी त्याला सोडून जाण्याचं सांगत धमकावताना दिसत आहे. जान्हवी निघून गेल्याची वार्ता कळताच जयंत व्याकुळ होतो आणि डोळ्यात पाणी आणत “मला सोडून नको जाऊ” अशी विनवणी करताना दिसतो. त्यावर जान्हवी म्हणते “आजवर तू मला खूप शिक्षा दिलीस, पण आता मी हे सहन करणार नाही. आजवर जसं तू मला सीसीटीव्हीच्या नजरेत कैद केलं, तसं आता मी तुला माझ्या बंधनात ठेवणार आहे. जर तुला मी हवी असेन, तर तुला माझं सगळं ऐकावंच लागेल”, असं म्हणत त्याला थेट इशारा देते.

आणखी वाचा – “तिने विवाहित पुरुषांसोबत…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर कुमार सानूचा लेक भडकला, सहा वर्ष अफेअर होतं आणि…

आता जान्हवीच्या या कडक भूमिकेचा परिणाम जयंतवर होणार का?, आणि ती त्याला नेमकी कोणती शिक्षा देणार?, जान्हवीच्या या कडक निर्णयामुळे जयंत सुधारणार का?, की याउलट तो जान्हवीला आणखी त्रास देणार हे सारं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: lakshmi niwas promomarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Farah Khan Cook Dilip Salary

अखेर फराह खानने केला कुक दिलीपच्या सॅलरीचा खुलासा, १० वर्षांपूर्वी होता २०,००० पगार, आता…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.