arbaaz khan and sshura khan daughter name : बऱ्याच वर्षानंतर सलमान खानच्या कुटुंबात चिमुकलीच्या येण्याने आनंदाचं वातावरण आलं आहे. अलीकडेच, ५८ वर्षीय अरबाज खान एका मुलीचा वडील झाला आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा हिने ५ ऑक्टोबरला मुंबईतील हिंदू हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आणि ८ ऑक्टोबरला रुग्णालयातून सोडल्यानंतर ती घरी पोहोचली. घरी आल्यानंतर अरबाजने अरहानच्या बहिणीचे नामकरण केले. तिचे नाव काय ठेवले आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे त्यांनी सोशल मीडियाद्वारे साऱ्यांना सांगितलं.
डिसेंबर २०२३ मध्ये अरबाझ खान आणि शुरा खान यांचे लग्न झाले आणि दोन वर्षांनंतर ते पालक झाले. मुलीला भेटण्यासाठी आईही आली होती. इतकंच नाहीतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि सलमा आणि हेलनसुद्धा सूनेला आणि नातीला पाहण्यासाठी आली होती. इस्पितळातून बाहेर येताना अरबाझ त्याच्या लेकीला उचलून घेताना दिसला. तर शुराने स्वत: ला बुरखाने झाकले होते.
आता शुरा आणि अरबाझ खान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केले आहे, ज्यात त्यांच्या मुलीचे नाव उघड झाले आहे. आपल्या मुलीच्या नावाचे वर्णन करताना अरबाझने लिहिले, “आमची लेक सिपारा खानचे स्वागत. शुरा आणि अरबाझकडून खूप प्रेम”. चाहत्यांचे आणि प्रियजनांचे प्रेम या पोस्टवर वर्षाव करत आहे. जननत झुबेर, रशा थडानी यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुन्नवर फारुकीची पत्नी महाजाबिन हिनेही तिचे प्रेम व्यक्त केले आहे. काहींना हे नाव खूप आवडले आहे आणि काहींनी नावावरून ट्रोल केले आहे.
अहवालानुसार, ‘सिपारा’ या नावाचा अर्थ हा कुराणला ३० भागांपैकी एका भागात विभागले गेले आहे, जे वाचन आणि समजण्यास मदत करते. हा एक पर्शियन शब्द आहे. याचा अर्थ एक सुंदर स्त्री किंवा एक फूल देखील आहे. असे म्हटले जाते की संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ प्रशंसा किंवा शक्ती देखील आहे. हे नाव संरक्षक किंवा ढाल देखील सूचित करते.





