शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाण भावाला घट्ट मिठी मारुन स्टेजवरच रडला, पायाही पडला अन्…; भावुक व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 23, 2024 | 5:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lakhat Ek Amcha Dada serial fame Nitish Chavan emotional seeing his elder brother in Zee Marathi Awards 2024

झी मराठी अवार्ड्स २०२४ मध्ये मोठ्या भावाला पाहून नितीश चव्हाण भावुक, व्हिडीओ व्हायरल

कोणताही पुरस्कार सोहळा म्हटलं की तो कलाकारांसाठी खास असतो. त्याचं कारण म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळते. अर्थात त्या आधी नामांकन मिळणंदेखील महत्त्वाचं असतं. कारण नामांकन मिळणंदेखील मोठी गोष्ट असते. येत्या २६-२७ तारखेला ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ पार पडणार आहे. यंदाचं झी मराठीचं पंचविसावं महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं झी मराठीचं संपूर्ण कुटुंब उत्कृष्ट आजपर्यंतच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि एकमेकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एकत्र एका छताखाली आलं. (Nitish Chavan Emotional)

नुकताच यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ‘झी मराठी’च्या २५ वर्षाचा अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी कलाकारांनी रेड कार्पेटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आताच्या आधुनिक फॅशनपर्यंत हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भव्य सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आले आहेत आणि यापैकी एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…

झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करण्यता आला आहे ज्यात पूर्वा कौशिक, राकेश बापट व नितीन चव्हाण हे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये नितीश चव्हाणच्या भावाने झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात खास हजेरी लावली. यावेळी आपल्या भावाला मंचावर पाहून नितीश खूपच भावुक झाला. यावेळी नितीशने असं म्हटलं की, “मी आज जे काही आहे माझ्या दादामुळे आहे. तो माझ्यासाठी करोडोतला एक दादा आहे”.

आणखी वाचा – बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”

झी मराठीने शेअर केलेला हा प्रोमो खूपच भावुक असून याकेली नितीश व त्याच्या भावाचा खास बॉण्ड पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. या प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. नितीश झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेच्या पाच वर्षांनी त्याने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक केलं आहे.

Tags: Nitish Chavan Big BrotherNitish Chavan EmotionalZee Marathi Awards 2024
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Jaya Bachchan Mother Demise News False

जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची माहिती निव्वळ खोटी, केअर टेकरने दिली माहिती, म्हणाल्या, "त्या ठीक आहेत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.