शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुळजाने सूर्याला केलं प्रपोज, होकार देणार का?, ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 12, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lakhat Ek Aamcha Dada serial update new promo Tulja proposing to Surya

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजाने सूर्याला केलं प्रपोज, जबरदस्त प्रोमो पाहिलात का?

काही दिवसांपूर्वीच आलेल्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हळूहळू आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेद्वारे अभिनेता नितिश चव्हाणने झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक केले. बहिणींना आईची माया देऊन जपणारा सूर्या दादा प्रेक्षकांना विशेष भावला. या मालिकेतील सूर्या आणि तुळजा ही फ्रेश जोडीही रसिकांचे मन जिंकत आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. सूर्या व तुळजा यांचे लग्न ही त्यांच्या आयुष्यात घडणारी अनपेक्षित गोष्ट होती. बालपणापासून सूर्या ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता ती तुळजा होती. अशातच आता तुळजाही सूर्याच्या प्रेमात पडणार आहे. (Lakhat Ek Aamcha Dada Serial Update)

सूर्या व तुळजा यांच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. तुळजाने सूर्याला नदीकाठी खास सरप्राइज देऊन प्रपोज केलं असल्याचे पाहायला मिळणार आहे. झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या रंजक कथानकाकहा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुळजा सूर्याबरोबर नदीकाठी फिरताना दिसत आहे. यावेळी दोघांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. तेव्हा सूर्या तुळजाला म्हणतो, “आपण इथे घर-घर खेळायचो.” तेव्हा तुळजा म्हणते, “तू नेहमी हे बोलायचा की, या घाटावर आपण आपलं घर बांधू या. मी घर बांधू नाही शकले पण तुझ्यासाठी हे तयार केलं आहे”. तिथे तुळजाने सूर्यासाठी एक खोली तयार केलेली असते आणि या खोलीला फुलांनी सजावट केलेली असते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?

सजवेलेली ती खोली पाहून सूर्या म्हणतो, “तुळजा हे कशासाठी?” तेव्हा तुळजा म्हणते की, “मी तुझ्या प्रेमात पडली आहे”. हे ऐकून सूर्या टाळ्या वाजवत “लय मोठा जोक केलास” असं म्हणतो. त्यानंतर तो जोरजोरात हसू लागतो. तेव्हा तुळजा चिडते आणि म्हणते, “प्लीज हसू नकोस. नाहीतर मी घाटावरून नदीत उडी टाकेन”. त्यानंतर तुळजा नदीत उडी टाकते आणि तिला पाहून सूर्याही लगेच तिला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकतो आणि म्हणतो, “तू उडी का मारलीस?” तेव्हा तुळजा नदीतूनच आय लव्ह यू सो मच सूर्या…. असं म्हणते.

आणखी वाचा – अशोक शिंदेंना ‘छावा’ चित्रपटाची होती ऑफर, भूमिकेसाठी दिला स्पष्ट नकार, म्हणाले, “नकारात्मक पात्र होतं आणि…”

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेक प्रेक्षकांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. “हे असंच व्हायला पाहिजे”, “झी मराठी पहिल्यांदा काहीतरी चांगलं दाखवत आहे”, “खूपच भारी” या आणि अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे नेटकऱ्यांनी या प्रोमोला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, आता तुळजाने सूर्याला प्रपोज केल्यानंतर सूर्या तिला काय उत्तर देणार? पुढे त्यांची ही लव्हस्टोरी कोणत्या नवीन वळणावर जाणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

Tags: Lakhat Ek Aamcha Dada Marathi SerialLakhat Ek Aamcha Dada Serial UpdateMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Hemansh Kohli Wedding Ceremony

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड लवकरच लग्नबंधनात अडकणार, हातावर काढली मेहंदी, मुलीचं नाव आहे…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.