Hemansh Kohli Wedding Ceremony : अभिनेता हिमांश कोहली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या या अभिनेत्याच्या प्री-वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याच्या मेहंदी सोहळ्याचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिमांशच्या मेहंदी सोहळ्यामध्ये त्याने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. इतकंच नव्हे तर यावेळी अभिनेता डान्सही करताना दिसला. हिमांशच्या लग्नाच्या चर्चा सुरु असल्या तरी अभिनेत्याने अद्याप नववधूचे नाव उघड केले नाही, ही चाहत्यांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे.
‘यारियां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता आणि नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख १२ नोव्हेंबर असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंगची झलकची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता हिमांश कोहलीच्या मेहेंदी व हळदी फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व फोटोंमध्ये हिमांशू खूप आनंदी दिसत आहे.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई झाली सपना चौधरी, बारशाला हजारो लोकांची उपस्थिती, नाव आहे फारच खास
यावेळी नवरा मुलगा हिमांशू कधी त्याच्या लग्नात नाचताना तर कधी हातावर मेहंदी लावताना दिसतोय. लग्नासाठीचा त्याचा आनंद या फोटोंमध्ये दिसत आहे. हिमांशने आपल्या भावी वधूचे नाव त्याच्या हातावर मेहंदीने लिहिले आहे. यावेळी अभिनेता त्याच्या मित्र व कुटुंबाबरोबर नाचताना दिसत आहे. हिमांशच हे लग्न अतिशय खासगी असेल, जिथे फक्त अभिनेत्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित असतील. समोर आलेल्या माहितीनुसार, हिमांशची भावी वधू इंडस्ट्रीबाहेरची आहे. हिमांश कोहली याआधी नेहा कक्करबरोबर रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांच्या लग्नाचीही चर्चा होत होती. मात्र या लग्नापर्यंत पोहचण्यासाठी त्यांचे ब्रेकअप झाले आणि २०२० मध्ये नेहाने रोहनप्रीतसह लग्न केले.
आणखी वाचा – चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?
हिमांशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘हमसे है लाइफ’, ‘जीना इसी का नाम है’, ‘स्वीटी वेड्स एनआरआय’, ‘रांची डायरीज’ आणि ‘अभी नहीं तो कभी नहीं’ मध्ये दिसला होता. रिपोर्ट्सनुसार, हिमांशच्या लाइनअपमध्ये ‘बूंदी रायता’ आणि ‘जुलिया आणि कालिया’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.