सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅमेरा बंद असताना फराह खान कशी वागते?, कुक दिलीपनेच केला खुलासा, म्हणाला, “खूप वाईट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2025 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
farah khan cook dilip

कॅमेरा बंद असताना फराह खान कशी वागते?, कुक दिलीपनेच केला खुलासा, म्हणाला, "खूप वाईट…"

farah khan cook dilip : फराह खान आणि तिचा कुक दिलीप नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघांनाही त्यांच्या व्हिडीओमुळे अधिक लोकप्रियता मिळाली आहे. या दोघांची केमिस्ट्री आणि धमाल-मस्ती प्रत्येक व्हिडीओद्वारे पाहायला मिळते. दोघांच्याही स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडेच, फराह आणि दिलीप यांनी व्हिडीओसाठी बोमन इराणीला गाठले. बोमन इराणी यांनी त्यांना पारसी डिश बनवण्यास शिकवले. शिकता शिकता त्यांच्यात अनेक गमती-जमतीही झाल्या. कॅमेरा बंद होताच फराह खान कशी वागते आणि तिचा स्वभाव नेमका कसा आहे, याबद्दल तिचा कुक दिलीपने भाष्य केलं.

व्हिडीओमध्ये, फराह खान कुक दिलीपला चेतावणी देताना दिसत आहे. ती दिलीपला असं सांगतेय की, जर ती बोमन इराणीसमोर झुकली तर तिचा नवरा शिरिश कुंदरला याबाबत काहीही सांगू नको. फराह म्हणाली की, बोमन इराणी तिचे आवडते आहे. यावर, बोमन इराणी कुक दिलीपला एकट्यात बोलण्यासाठी बाजूला नेतो. कॅमेराचे शूटिंग थांबवत त्याने दिलीपला काही गोष्टी विचारल्या.

आणखी वाचा – ‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडे होणार बाबा?, गुपचूप लग्नाची चर्चा झालेल्या मुलीने शेअर केले डोहाळजेवणाचे फोटो, नक्की सत्य काय?

बोमन इराणीने दिलीपला विचारले, “कॅमेरासमोर फराह खान जितकं चांगलं बोलते, तर कॅमेरा बंद असताना ती तितकंच चांगलं बोलते का?”. यावर दिलीप म्हणतो, “खूप खडूस आहे”. बोमनने पुन्हा विचारले की फराह खान नेहमीच त्याच्या समोर त्याची स्तुती करते, परंतु कॅमेर्‍याच्या मागेही करते का? यावर, दिलीप म्हणाला, “नाही, ती खूप वाईट बोलते”.

आणखी वाचा – सुंदर सजावट, आकर्षक इंटेरियर अन्…; ‘लग्नानंतर होईलंच…’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, व्हिडीओद्वारे दिसली झलक

बोमन इराणीने पुन्हा विचारले की, “फराह खान डाएटवर आहे का?, आणि डाएटसाठी ती काय खाण्याला प्राधान्य देते?”. यावर दिलीप म्हणाला, “फराह मॅम डाएटवर नाही आहेत. त्या खूप सारं खातात. जेव्हा ते डाएट वर असतात तेव्हा डाळ-भात, सूप-भात…पण जेव्हा डाएट सुरु नसतो तेव्हा त्या खूप खातात”. दिलीपबद्दल बोलायचे झाले तर, फराह खानच्या व्हीलॉग्समुळे त्याला स्टारडम मिळाले आहे. दिलीप बराच काळ फराहबरोबर काम करत आहे. फराहने सांगितले होते की, दिलीप तिला अजय देवगनच्या बंगल्याच्या बाहेर भेटला होता. दिलीपचा भाऊ भोला अजय देवगनकडे काम करतो. दिलीपचे कुटुंब बिहारमध्ये राहते आणि फराह त्याच्या मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत शिकवत आहे.

Tags: entertainmentfarah khanFarah Khan Cook Dilip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
amruta khanvilkar best actress

"थांबण्याची वेळ…", परदेशात असल्याने पुरस्कार स्वीकारायला पोहचू शकली नाही अमृता खानविलकर, भावुक होत म्हणाली, "मोठी जबाबदारी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.