सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 19, 2025 | 6:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
achint kaur struggle for work

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री

कलाक्षेत्रात मिळालेली प्रसिद्धी, पैसा जपण्यासाठी कलाकारांना बहुदा विशेष मेहनत घ्यावी लागते. चंदेरी दुनियेत वावरत असताना प्रेक्षकांना, चाहत्यांना दिसतो तो फक्त या मंडळींचा पैसा व ग्लॅमर. पण वाट्याला प्रसिद्धी जर दिवसागणिक कमी होत गेली तर नशिबी आलेलं नैराश्य पाचवीला पुजलेलंच. यशाबरोबरच अपयश पचवण्याची ताकदही असावी हे वाक्य कलाकारांनाही लागू होतं. एखादा प्रोजेक्ट सुपरहिट ठरला तर कलाकारांकडे कामं येत जातात. पण काही कलाकारांच्या बाबतीत काही उलटंच घडतं. सुपरहीट चित्रपट, मालिका करुनही बऱ्याचदा काम मिळत नाही. मग अशावेळी नैराश्य वाट्याला येतं. असंच आता मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. (achint kaur struggle for work)

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’ सारख्या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री अचिंत कौर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिने आतापर्यंत २० टीव्ही शो, २२ चित्रपट काम केलं. मात्र वयाची ४७शी गाठल्यानंतरही अचिंतकडे काम नाही. तिची अवस्था पाहूनही ओळखणं कठीण झालं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत अचिंतने काम मागितलं आहे. तसेच व्हिडीओद्वारे संपूर्ण परिस्थिती सांगितली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

View this post on Instagram

A post shared by Achint Kaur (@chintzykaur)

अचिंत म्हणाली, “सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे ठीक आहात अशी आशा करते. मी मनापासून हे बोलत आहे. मी एक कलाकार व व्हॉइस आर्टिस्ट आहे. मला बऱ्याच प्लॅटफॉर्मबाबत खूप वर्षांचा अनुभव आहे. मी आता देशात व आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करण्यास इच्छुक आहे. शॉर्ट फिल्म, फिचर फिल्म, वेबसीरिजमध्ये किंवा व्हॉइस आर्टिस्ट म्हणून कामंही करायला मी तयार आहे. काही क्रिएटीव्ह काम असेल तर मी माझं १०० टक्के त्यासाठी देईन”.

आणखी वाचा – एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू अन्…

“तुमच्या ओळखीमध्ये कास्टिंग करणाऱं कोणी असेल तर कृपया मला संपर्क करा. कारण मी काम करण्यास खूप उत्साही आहे. त्याचबरोबरीने मी माझी मॅनेजर तनुजा मेहरा, सोशल मीडिया मॅनेजर रेवा खरे शर्मा यांची सविस्तर माहिती कॅप्शनमध्ये देत आहे. इतकंच बोलायचं होतं. माझं बोलणं ऐकलं आणि नेहमीच मला पाठिंबा दिलात त्यासाठी सगळ्यांचे आभार”. अचिंतने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये चढ-उतार हे असतात. पुढे काय होईल यासाठी मी तयार आहे. जर माझं काम तुमच्या नजरेत चांगलं असेल तर मला कृपया मदत करा”. अचिंतने आतापर्यंत, २ स्टेट्स, हिरोइन, कलंक, हॉन्टेड ३डी सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. १८व्या वर्षातच तिने लग्न केलं. पण काही वर्षांतच तिचा संसार मोडला. त्यानंतर अचिंत अभिनेते मोहन कपूर यांना डेट करत होती. बरेच वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर त्याही रिलेशनचा दि एण्ड झाला. पहिल्या नवऱ्यापासून अचिंतला २२ वर्षांचा मुलगा आहे. ती एकटीनेच त्याचा सांभाळ करते.

Tags: bollywood newsentertainment newsHindi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sharmila Shinde Shares Experience

"सीनमध्ये बाळ गेलं पण…", 'नवरी मिळे…'मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, "रडले, रागावले…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.