मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार टोलचा मुद्दा लावून धरला आहे. यावरून त्यांनी अनेकदा खळखट्याकदेखील केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नाट्य संमेलनावरुन परतत असताना त्यांनी स्वत: टोल नाक्यावर उतरुन टोल न देता सर्व गाड्यांना प्रवेश दिल्याचा व्हिडीओदेखीलचांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या टोलबाबतच्या भूमिकांवर अनेकदा संमिश्र प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या गेल्या.
मात्र आता राज ठाकरेंच्या टोलबाबतच्या भूमिकेवर सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अंकिता वालावालकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताबरोबर नुकतंच एका टोल नाक्यावर तिच्याकडून दोन वेळा पैसे घेतले गेलं असल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. ‘टोल का झोल’ असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओद्वारे तिने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल सर्वांना जागरुक राहण्याचे आवाहनही केल आहे.
या व्हिडीओ मध्ये तिने असं म्हटलं आहे की, “दिनांक २६ मार्च २०२४ रोजी मी मालवण ते मुंबई असा प्रवास करत होते. वाशी टोलनाक्यावर जेव्हा माझी गाडी आली, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की फास्टटॅग स्कॅन होत नाही आहे. त्यामुळे तुम्ही रोख रक्कम द्या आणि मी ते दिले. जेव्हा मी मुंबईत पोहोचले तेव्हा मला फास्टटॅगमधून पैसे गेल्याचाही मॅसेज आला. त्यामुळे माझे दोनवेळा पैसे गेले. यानंतर मी त्या मॅसेजवरील टोल फ्री नंबरवर कॉल पांच दिवस कॉल केले. पण त्यावर काही प्रतिसाद आलाच नाही.”
आणखी वाचा – अस्तिका पुन्हा नागरुपात, विरोचकाचा तिलाच दोष, कुटुंबातील नव्या सदस्याचा बळी जाणार?, मालिकेला रंजक वळण
यापुढे तिने असं म्हटलं की, “मग मी विचार केला की जाऊ दे, ४५ रुपयेच तर होते. काय एवढा वेळ फुकट घालवायचा? पण माझ्यासारख्या अशा हजारो लोकांनी ४५ रुपये सोडले तर काय होईल… हा विचार करुन मला या विषयावर बोलावसं वाटलं. जेव्हा राजसाहेब (राज ठाकरे) टोलनाक्याच्या मुद्द्यावर बोलतात, तेव्हा कमेंट सेक्शनमध्ये “यांच्याकडे फक्त टोल हा एकच मुद्दा आहे का?” अशा अनेक कमेंट्स येतात. पण टोल हा मुद्दा किती गांभीर्याने घेतला पाहिजे, या टोलमध्ये किती झोल आहेत याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.”
यापुढे तिने सर्वांना आवाहन करत असं म्हटलं आहे की, “यापुढे कधी तुमची गाडी टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन होत नाही. त्यामुळे रोख रक्कम द्या. असं सांगण्यात आलं तर त्यांना एकच सांगा की, भारत चंद्रावर पोहोचला, तरी पण अजून तुमचे जर स्कॅनर नीट नाहीत तर ते आधी नीट करुन घ्या”. दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्सद्वारे त्यांच्याबरोबरही हा प्रसंग झाला असल्याचे म्हटले आहे.