सध्या प्रेक्षकांमध्ये रील्सची क्रेज असलेली पाहायला मिळतेय. हे रील्स बनवणारे सोशल मीडिया स्टार प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत असतात. स्वतः कन्टेन्ट तयार करून हे सोशल मीडिया स्टार अनेक व विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. यांत प्रेक्षकांची, कलाकारांची सर्वांचीच लाडकी सोशल मीडिया स्टार बनली आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर. अंकिताने आजवर तिच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य करण्यावरून चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. इतकेच नव्हे तर ती चाहत्यांची लाडकी आहे. अंकिताने तिच्या कोंकणी बोलीभाषेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. कलाकरांप्रमाणे आता अंकिताही फेमस झाली आहे. (Kokan Hearted Girl on Onkar Bhojane)
काही दिवसांपूर्वी अंकिता आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने यांच्यात अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेला ओंकार भोजने यांचे फोटो देखील वायरल झाले होते. नेटकऱ्यांच्या या चर्चेला अंकिताने पूर्णविराम दिला होता, अंकिताने ती ओंकारची खूप मोठी फॅन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंकिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.
ओंकारबरोबरच्या नात्याबाबत भाष्य करत अंकिता म्हणाली, “ओंकार भोजने आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. माझं काम त्याला आवडतं, मी भाष्य करत असलेले सामाजिक मुद्दे त्याला आवडतात असं त्याने म्हटलं होतं. त्यावरून ही अफवा पसरवण्यात आली. हल्लीच मला एक अभिनेते भेटले होते, त्यांनी मला माझ्या आणि ओंकार भोजनेच्या लग्नाबद्दल विचारले. त्यावर मी त्यांना नाही, असं काहीही झालेलं नाही’ असं म्हटलं. ”
यापुढे बोलताना अंकिता म्हणाली, “ओंकार हा मित्र म्हणून एक खरंच खूप चांगला व्यक्ती आहे. मी सिनेसृष्टीतील नाही. माझा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. पण जेव्हा मला एकटं वाटतं किंवा एखादी गोष्ट मला कळत नाही, त्यावेळी जर मी कोणाला मेसेज करु शकते तर तो व्यक्ती म्हणजे ओंकार भोजने. त्याला मी एखाद्या विषयाबद्दल सहज विचारु शकते.”
यापुढे बोलताना अंकिता म्हणाली, “माझं कुठेही काहीही अडलं आणि जर मी त्याला सांगितलं, तर तो असा व्यक्ती आहे की एकतर तो स्वत: उभा राहतो किंवा तो इतर मित्रांना तिथे उभा करु शकतो. तसा तो माझा सिनेसृष्टीतील एक मित्र आहे. पण तो शनिवार-रविवार सोडून बाकी सर्व दिवस माझ्यासाठी उपलब्ध असतो. कारण शनिवार-रविवार त्याचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत, असं त्याने मला सांगितलंय”.