छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकेसह मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ ही मालिका यशस्वीपणे टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची मन जिंकत आहे. तर मालिकेत जेठालाल, दया, तारक मेहता, बबिता जी या पात्रांनी लोकप्रियता आणखी वाढवली आहे. भारतात सर्वाधिक पहिल्या गेलेल्या मालिकांमधील ही एक मालिका आहे. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Fee)
ही कलाकार मंडळी मालिकेत काम करण्यासाठी प्रति-एपिसोड किती फी घेतात याबद्दल फार कमी जणांना कदाचित ठाऊक असेल. टप्पू सेना सुरुवातीपासूनच या मालिकेचा प्रमुख एक भाग आहे. प्रत्येक एपिसोडसाठी ही टप्पू सेना सुमारे १०,००० ते १५,००० रुपये मानधन आकारतात. तर पोपटलाल या नावाने प्रसिद्ध असलेले श्याम पाठक त्याच्या पात्रासाठी प्रति एपिसोड सुमारे ६०,००० रुपये मानधन घेतात. या शोमध्ये ते लोकप्रिय वृत्तपत्रातील एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे.
तनुज महाशब्दे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये अय्यरची भूमिका करत आहेत. ते प्रति एपिसोड सुमारे ६५,००० रुपये मानधन आकारतात. २००८ मध्ये ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ते या मालिकेचा एक भाग आहेत. मंदार चांदवडकर यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आत्माराम भिडे यांची भूमिका साकारली आहे. त्यांची गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम ही भूमिका विशेष गाजली. त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तो प्रति एपिसोड ८०,००० इतके मानधन घेतो. सोनालिका जोशीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये भिडे यांच्या पत्नी माधवीची भूमिका केली आहे. जी गोकुळधाम सोसायटीत लोणचे व पापड व्यवसायासाठी ओळखली जाते. ती तिच्या पात्रासाठी प्रति एपिसोड ३५,००० रुपये घेते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील आदरणीय भूमिका बापूजी उर्फ चंपक लाल गडा साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अमित भट्ट प्रत्येक भागासाठी सुमारे ७०,००० रुपये आकारतात. मालिकेचे चाहते जेठालाल व टप्पूपाठोपाठ बापूजी यांनाही पसंती देत आहेत.मुनमुन दत्ताला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता जी म्हणून ओळखले जाते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी ती ५०,००० – ७५,००० रुपये कमावते.