‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली. या मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पुर्वा फडके साकारत आहे. तर आशु ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता शाल्व किंजवडेकर साकारताना दिसत आहे. या मालिकेत शाल्वच्या आशु या पात्रावर प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. शाल्वने याआधी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत छोटा पडदा गाजवला. (Shalva Kinjawdekar Wife)
याआधी शाल्वची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिकाही प्रचंड गाजली. या मालिकेतील ओम आणि स्वीटू या दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. शाल्व सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरुन त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही ना काही शेअर करताना दिसतो. ‘शिवा’ मालिकेत आशु व शिवा यांचा लग्नाचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे.
खऱ्या आयुष्यातही आशु म्हणजेच शाल्व लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शाल्वने मुहूर्त असं लिहीत त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटोही शेअर केला होता. शाल्वची होणारी पत्नी श्रेया दफळापूरकर आहे. शाल्व व श्रेया यांची जोडी खूपच सुंदर आहे. एकमेकांना शोभेल असा हा जोडा आहे. नेहमीच दोघे एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात, आणि याचे फोटो, व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर देखील करतात. दोघांनी अगदी थाटामाटात त्यांचा साखरपुडा समारंभही उरकला. त्यांच्या साखरपुड्याचेही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
शाल्व गेल्या काही वर्षांपासून श्रेयाला डेट करत आहे. त्यांच्या नात्याला दोन वर्षे पूर्ण होताच त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर प्रेमाची कबुलीही दिली होती. श्रेया ही स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे. श्रेयाचा तालम या नावाने कपड्यांचा व ज्वेलरी ब्रँड आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.