सानिया मिर्झाचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. २०१० मध्ये सानिया मिर्झाने क्रिकेटर शोएब मलिकसह लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे. पण सानिया व शोएबचे हे नाते फार काळ टिकले नाही. शोएब व सानियाने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर सानिया आपल्या मुलाला एकटीने वाढवत आहे. शोएबने घटस्फोटानंतर तिसरे लग्न केले आहे. तर सानिया आता प्रेमाच्या शोधात आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तिने याबाबतचा खुलासा केला आहे. (Sania Mirza Love Life)
मेरी कोम आणि सानिया मिर्झा कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल’ या शोला हजेरी लावणार आहे. या शोच्या पुढच्या भागात ते दिसणार आहेत. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये कपिल शर्मासह सानिया व मेरी गप्पा मारताना दिसत आहेत. या शोमध्ये कपिल सानियाबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये कपिल शर्मा सानिया व मेरीबरोबर संवाद साधताना दिसत आहे. मेरी कोम सानिया वा सायनामध्ये गोंधळताना दिसत आहे. तर कपिल देखील मेरीला तिच्या लग्नाबद्दल चिडवताना दिसत आहे. कपिलने सानियाला आठवण करुन दिली की, शाहरुख खानने तिच्या जीवनावर चित्रपट बनवल्यास त्यात प्रेमिकाची भूमिका करण्याची ऑफर तिला दिली होती. सानियाने कपिलला या प्रकरणावर शांत केले आणि म्हटले की, “सध्या मला आधी प्रेमाची आवड शोधावी लागेल”. सानियाचे हे उत्तर ऐकून कपिल शर्मा व अर्चना पूरण सिंह जोरजोरात हसायला लागले.
२०१६ मध्ये शाहरुख खानने सानियाचा बायोपिक प्रदर्शित केला होता. लॉन्चदरम्यान शाहरुखने चित्रपट निर्मितीसह सानियावर बनत असलेल्या चित्रपटात काम करण्यास सांगितले होते. शाहरुख म्हणाला होता, “मला असे वाटते की जेव्हाही सानियावर चित्रपट बनेल तेव्हा तो खूप प्रेरणादायी आणि अद्भुत असेल. आणि मला माहित नाही तिला विचारा की ती मला तिची आवड खेळू देईल का? पण, मी त्याची निर्मिती नक्कीच करेन”.