Suraj Chavan On Bigg Boss Marathi 5 : कोणताही लग्न समारंभ असो वा कोणताही इव्हेंट प्रत्येकजण आपलं टापटीप दिसावं म्हणून अगदी योग्य कपडे, दागिने, सूटबूट घालून जातो. वा एखाद्या पार्टीलाही जाताना आपण तिथे कसे चांगले दिसू वा त्या पार्टीत उपस्थित असणाऱ्यांपैकी एक दिसू याची काळजी प्रत्येकजण घेत असतो. घराबाहेर पडताना आपण कसे दिसतोय हे प्रत्येकजण आरशात पाहतो. बाहेर पडल्यानंतर लोक आपल्याला पाहतील आणि आपण काय घातलं आहे यावरुन ते आपल्या बद्दलचा दृष्टिकोन निर्माण करतील याची काळजी साऱ्यांनाच सतावत असते. सध्या एक रिऍलिटी शो जोरदार सुरु आहे. आणि या शोमध्ये जाण्यासाठीही स्पर्धक मंडळींनी बरीच तयारी निर्माण केली.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणाऱ्या सदस्यांनी अगदी दोन महिने आधीपासून घरात जाण्यासाठीची तयारी सुरु केली. चार ते पाच बॅग भरून त्यांचं सामान हे ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचलं होतं. अगदी कोणत्या दिवशी कोणते कपडे घालायचे, काय करायचं, कसं राहायचं याबाबत त्यांचं श्येड्युल आधीच ठरलेलं होतं. कारण लाखो-करोडो लोक हा शो पाहत असतात. पण या घरात सहभागी झालेला एक स्पर्धक आहे जो या सगळ्यापासून कायम दूर राहिला. हा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला तेव्हा फक्त त्याने दोन टीशर्ट व तुटलेली चप्पल घेतली होती, अशी चर्चा सुरु होती.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर भारतात परतली हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची बायको, मुलाला ठेवलं सासरी, पुन्हा पॅचअप?
संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहणार आहे, मात्र परिस्थितीची जाण ठेवून कुठलीही भीती न बाळगता आहे त्या वेशात त्याने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. लोकांना मोठेपणा दाखवण्यासाठी त्याने कुठलीही सोंग केलं नाही. कोणाकडेही न मागता जे आपल्या पदरात आहे ते घेऊन त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली. सूरज हा खेडेगावातून आलेला स्पर्धक आहे. टिकटॉक स्टार सूरजने त्याच्या विनोदी अंगाच्या व्हिडीओने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर सूरजने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं.
आता सूरजला कोल्हापुरातील एका डिझाइनरने कपडे भेट म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर ते हे कपडे सूरज कडून पुन्हा घेत नसून त्यांनी खास सूरजसाठी हे कपडे भेट दिले आहेत. अत्यंत सर्वसामान्य घरातून, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या घरात गेम कळाला नसला तरी त्याला माणसं कळली आहेत.