‘सातारचा बच्चन’ म्हणून ओळख मिळवणारे किरण माने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. फेसबुकवरून अनेक पोस्ट शेअर करत ते नेहमीच प्रेक्षकांसमोर विविध विषयांवर भाष्य करत असतात.अशातच किरण माने यांनी आताकेलेली पोस्ट चर्चेत यायचं कारण म्हणजे या पोस्टचा रोख अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीकडे आहे. (kiran mane slams sharad ponkshe)
काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेक वैमानिक झाल्याची खुश खबर सगळ्यांसोबत शेअर केली. ‘बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली’, अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी लेक सिद्धी पोंक्षेच कौतुक केलं. आरक्षणाबाबत केलेल्या वक्त्यव्यावरून बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
पाहा किरण माने यांची पोस्ट (kiran mane slams sharad ponkshe)
“पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करिअरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील. घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणाऱ्या हादऱ्याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गावात तुला बापूजींचा पुतळा दिसेल!
गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील. सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील. तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करिअर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात, धर्म, वंश, रंग, प्रांत, देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी. तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!” असं म्हणत किरण माने यांनी नाव न घेता शरद पोंक्षे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा – “पुरुषांचं भारी पण कोण दाखवणार?” अशोक सराफ यांनी बाईपण पाहून दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पण पुरुष मंडळी..”
अनेकांनी किरण माने यांच्या या पोस्टखाली कमेंट करत करत शरद पोंक्षे यांना ट्रोल केलं आहे.
