काही अभिनेते त्यांच्या अभिनयामुळे स्वतः सोबतच आपल्या जन्म भूमीचे, शहराचे, गावाचे नाव मोठं करत असतो. असाच एक अभिनेता ज्याला साताऱ्याचा बच्चन म्हणून ओळखले जाते. मराठी चित्रपट, मराठी मालिका यांसोबतच मराठी मधील प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस मध्ये ही किरण मानेंनी आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मन जिंकली. (kiran mane)

किरण माने हे त्यांच्या अभिनय कौशल्यासोबत ते त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तल्लख बुद्धीने खेळ खेळत किरण मानेंनी टॉप ३ पर्यंत बाजी मारली. अभिनय सोबतच किरन माने त्यांच्या विधानांसाठी ही चांगलेच चर्चेत असतात. शोषलं मीडिया वर ही त्यांचा चांगलाच वावर दिसून येतो.(kiran mane)
====
हे देखील वाचा- पडद्यामागचे नायक आता पडद्यावर सचिन गोस्वामी दिसणार नव्या भूमिकेत
====
बिग बॉस मराठी सिझन ४ संपल्यानंतर मानेंनी एक आनंदाची बातमी शेअर केली. किरण माने आता लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंबंधीत त्यांनी एक फोटो शेअर केला.विशेष म्हणजे ते महेश मांजरेकर यांच्यासोबत आगामी चित्रपटात झळकणार आहेत त्यांनी मांजरेकरांसोबत एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.

”वास्तव’ हे हाय की, आता ‘कॅमेरा’ माझी आन् मी कॅमेर्याची पाठ सोडत नसतोय. मी येतोय भावांनो… लवकरच… एका नादखुळा भुमिकेत… वुईथ ‘द महेश मांजरेकर’ ! अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए.. मौसम बिगड़ने वाला है… तर नेमकं कोणत्या चित्रपटात ते झळकणार आणि त्याची भूमिका कोणती हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.पण चाहते सध्या त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झालेत तसेच त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(kiran mane)