Kim Kardashian Sister Kourtney Breaks Silence : किम कार्दशियनची बहीण कोर्टनी कर्दाशियन हिच्या १५ वर्षांच्या मुलाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर असे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत ज्यात कोर्टनी कार्दशियनचा अवघा १५ वर्षांचा मुलगा मेसन डिस्क हा एका मुलाचा बाप झाला आहे. आता या अफवांवर त्या मुलाच्या आईने मौन सोडले असून असे बोलणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिने तिचा मुलगा मेसन डिसिकबद्दल सुरु असलेल्या अफवांवर टीका केली आणि अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर व्हायरल होणाऱ्या या अहवालांना खोटे ठरवले.
किम कार्दशियनची बहीण कोर्टनी कर्दाशियन हिने लेकाची बाजू घेत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “तिचा १५ वर्षांचा मुलगा बाप होणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि साऱ्यांनी वर्तविलेल्या हा अंदाज साफ खोटा आहे”. तिने पुढे असं म्हटलं की, “मी क्वचितच माझ्याबद्दल किंवा माझ्या कुटुंबाबद्दलच्या अफवा किंवा षड्यंत्रांबद्दल बोलते, परंतु हे माझ्या मुलाबद्दल आहे आणि हे खरे आहे असा क्षणभरही कोणालाही विचार करु द्यायचा नव्हता, या बातम्या खऱ्या नाहीत”.
कोर्टनीने लिहिले की मेसनला मुले नाहीत. मेसनच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्यात आल्याचेही तिने सांगितले. कोर्टनी म्हणाली की, तिच्या मुलाचे सार्वजनिक प्रोफाइल नाही आणि चाहत्यांनी ऑनलाइन पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
आणखी वाचा – “औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?
त्याच वेळी, मेसनचे वडील स्कॉट डिक्सिक यांनीही मेसनच्या किशोरवयीन गोष्टींबद्दल भाष्य केले आहे. लोकांशी झालेल्या संभाषणात तो म्हणाला आहे की, “जर मेसन काही अडचणीत सापडला असेल तर मी त्याच्याशी त्याच्या आयुष्याबद्दल बोलतो. जसं की, मी केलेल्या चुका, मी काय केले आणि माझ्यासाठी काय प्रभावी आहे, जे माझ्यासाठी प्रभावी नव्हते अशा प्रकारचा संवाद आम्ही करतो”.