रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, प्रेमकथेवर आधारित ‘माझी प्रारतना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2025 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
New Marathi Movie Announcement

नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, प्रेमकथेवर आधारित 'माझी प्रारतना' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर समोर

New Marathi Movie Announcement : प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी निराळी असते. प्रेमाला कोणतेही बंधन नसते, कोणत्याही सीमा नसतात. वय, जात, रूप, किंवा स्वरूप याची अडचण नसते. दोन जिवलगांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम. आणि प्रेमाचे अनेक रूप घेऊन नेहमीच आशयघन असे मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत असतात. अशातच भर घालत एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.

ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे, जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडणार आहे. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की, वादळासारखी प्रत्येकाच्या मनावर आदळेल. आयुष्यात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते, आणि हा मन हेलावून टाकणारा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेम हीच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे, याचे हुबेहूब वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे.

आणखी वाचा – अभिषेक बच्चनला घट्ट मिठी अन् अक्षय कुमारकडे दुर्लक्ष, रेखा यांचं वागणं सगळ्यानांच खटकलं, व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे, तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे. चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात असली तरी लवकरच टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.

आणखी वाचा – “औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?

चित्रपटाचा पहिलं पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्कंठेने उच्चांक गाठला आहे, आणि ‘माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा असल्याचं दिसत आहे. चित्रपटाचे हे पोस्टर पाहून नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे यांत शंका नाही.

Tags: Majhi Prarthana Akalpaniya Premkathanew marathi movieNew Marathi Movie Announcement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
monika dabade In Star Pravah Award

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची रेड कार्पेटवर एन्ट्री, ग्लॅमरस लूक व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.