सध्या सर्वत्र ‘खतरो के खिलाडी’ च्या १४ व्या पर्वाची चर्चा सुरु आहे. वेगवेगळे स्टंट करुन त्यातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रोहित शेट्टी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या शो आजवर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आता रोहित व आसिम रियाज यांच्यातील वाद विवाद समोर आले आहेत. याबद्दल सर्वत्र सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. तसेच अर्जित तनेजा व कुशल टंडन यांनी इतर कंटेस्टन्ट व रोहित यांनी याबद्दल आपले मत मांडले . तसेच भाऊ उमर रियाजनेही भावाची बाजू घेतली आहे. (umar riaz on rohit shetty)
‘खतरो के…’ हा शो लाईव्ह झाला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. अशातच आता नवीन भागामध्ये आसिमबद्दल खूप चर्चा सुरु आहे. या भागात असीमचे अभिषेक व्यतिरिक्त रोहितबरोबरदेखील भांडण झाले आहे. यावरुन उमर रियाजने भावाची बाजू घेत पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कोणाला इतकाही त्रास देऊ नका ज्यामुळे त्यांच्यातील राक्षस बाहेर येईल. त्यानंतर जे काही होईल ते चांगले होणार नाही. प्रेम एखाद्यासाठी चमत्कार ठरु शकतं तर तिरस्कार एखाद्याचा विनाशही करु शकतो”.
Dont degrade someone to a level that their worst demons comes out!
— Umar Riaz (@realumarriaz) July 29, 2024
After that anything that happens is not justified and never will be!
Love can do wonders to a person and hate can make a person his own worst enemy!
Just saying!
त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी आसिमला ट्रोल केले जात आहे. कुशल व अर्जितने त्याला खडे बोल सुनावले आहे. कुशलने लिहिले आहे की, “याने माझ्याबरोबर असे करायला हवे होते. याला मदतीची गरज आहे. मी दोन-तीन स्पर्धकांना इथे मारायलाच आलोय. ही कोणती वस्तु नाही की तुम्ही माराल. जेव्हा ते म्हणतात की मी पैसे नाही घेणार आणि कोणी हा स्टंट करुन दाखवेल तर तुम्ही तुमच्या शब्दावर अडून राहिलं पाहिजे आणि पैसे घेऊ नयेत”.
पुढे त्याने लिहिले की, “संपत्ती काय आहे भाऊ. एक बिग बॉस? आणि तुम्ही गाड्या काय चालवत आहात. फक्त सेकंड हँड गाडी? किती पैसे आहेत रे? बँक अकाऊंट डिटेल्स शेअर कर. रोहित सरांना सलाम. त्यांनी या माणसाला सहन केलं, रोहित सरांचा खूप आदर आहे”.अर्जितनेही लिहिले की, “मी मागील वर्षी या कार्यक्रमात होतो. या कार्यक्रमामुळे मी माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण जगलो आहे. हा एक स्टंटचा शो आहे बिग बॉस नाही. हे मी असताना व्हायला पाहिजे होतं. रोहित सर या वेड्या माणसाला कसं सहन करत असतील. असीमला मदतीची गरज आहे”.
Sohrat kya sohrat bro , Ek big boss 😃? And what car he is flaunting about second hand cars ? Kitnaaa paisaaaa hain be ? Bank accounts details share karna , hats of to Rohit Shetty sir how he handled that crap 💩 huge respect 🫡 for Rohit sir https://t.co/Hqd65VJc8B
— KUSHAL TANDON (@KushalT2803) July 29, 2024
हा सर्व प्रकार रोहित व असीम यांच्यामध्ये एका स्टंटदरम्यान झाला होता. एक स्टंट असीम करु शकत नाही आणि तो स्टंट करण्यावर प्रश्न उपस्थित करतो. तो म्हणतो की हा स्टंट जॉ करेल त्याला मी पैसे देईन. त्यावरुन रोहित व असीममध्ये शाब्दिक वाद होतात.