नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने चक्क पहिल्याच दिवशी सिनेमागृहांमध्ये जम बसवला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट असून हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांची भूमिका ही वजनदार होती. अशीच या चित्रपटातील एक महत्वपूर्ण व्यक्तीरेखा साकारलेली अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी. निवडक आणि महत्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी आजवर अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे. (Kedar Shinde Rohini Hattangady)
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून रोहिणी हट्टंगडी यांच्यासोसबतचा फोटो पोस्ट करत त्यांनी लक्षवेधी असं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे. ‘आयुष्यात फक्त समोरा समोर आल्यावर हाय हॅलो नमस्कार, या व्यतिरिक्त काही झालं नाही. कारण मनावर ती समोर आली की, दडपण असायचं. बरं ती तशी दडपण देणारी नाहीच. पण या आधी जी तीने कामं केला आहेत, त्याचा प्रभाव एवढा की, न मागता दडपण यायचं. गांधी, सारांश, चालबाज, अग्नीपथ… एका पेक्षा एक सरस भुमिका डोळ्यासमोरून सरकल्या, जेव्हा मी तीच्या दारात उभा होतो तेव्हा!!
पहा केदार शिंदेंची रोहिणी यांच्यासाठीची भावुक पोस्ट (Kedar Shinde Rohini Hattangady)
baipanbhaarideva साठी जर ती नाही म्हणाली तर??? मनात चलबिचलता! पण भुमिका ऐकताच एका क्षणात होकार दिला. पुढे काम करताना जाणवलं की, ती खुप सोपी आहे. तीचं तीचं तीने रिंगण निर्माण केलंय, ते तीच्या कामाने! तीचात attitude नाही… पण खुपचं professional approach आहे. ती तुमच्यात असते पण, नसते पण! कलाकाराने असच असायला हवं. स्क्रीनवर किती आणि केवढं काम करायचं? याचं गाईड आहे ती. (Kedar Shinde Rohini Hattangady)
हे देखील वाचा – ‘फॅन्स सोबत गद्दारी’, म्हणणाऱ्या चाहत्याला नम्रताने दिलं प्रतिउत्तर
मी या सिनेमाच्या निमित्ताने खुप शिकलो. ती लेक्चर देत नाही. पण तीची शांतता खुप शिकवून जाते. सिनेमातली जया म्हणजे माई अगदीच अशी आहे. रोहिणी हट्टंगडी मला वादळापूर्वीची शांतता वाटते. आणि ते वादळ फक्त अभिनयाचं असतं…”, असे केदार शिंदे यांनी म्हटलं.
