शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पाकिस्तानात पाठवा”, पहलगाम हल्ल्यानंतर करीना कपूरने पाकिस्तानी डिझाइनरसह पोज देताच नेटकरी भडकले, म्हणाले, “बॉलिवूडचे देशद्रोही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2025 | 9:46 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kareena Kapoor Trolled

पहलगाम हल्ल्यानंतर करीना कपूरने पाकिस्तानी डिझाइनरसह पोज देताच नेटकरी भडकले

Kareena Kapoor Trolled : पहलगम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी चित्रपटांच्या प्रकाशनावर बंदी घातली गेली आहे. यासह, पाकिस्तानी कलाकारांबद्दल भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची पाकिस्तानी डिझायनर फराज मन्नान बरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत. आणि हे फोटो पाहून, भारतीय चाहते संतापले आहेत. हे फोटो पाहून अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करीत आहेत. करीना कपूर अलीकडेच एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली. यादरम्यान, तिने पाकिस्तानी डिझायनर फराज मन्नान याची भेट घेतली आणि दोघांनीही एकत्र उभे राहत फोटो काढले.

फराजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर करीनाबरोबरचे आपले फोटो शेअर केले. पहिल्या फोटोसह, त्याने ‘ करीना कपूरसह’, असं कॅप्शन दिलं. दुसर्‍या फोटोमध्ये करीना कपूर फराज मन्नानच्या खांद्यावर हात ठेवत पोझ देताना दिसली. यावेळी बरेच लोकही त्याच्याबरोबर दिसू लागले. फोटोमध्ये करीना पांढर्‍या कॉर्डसेटमध्ये दिसली, तर फराझ काळ्या टी -शर्ट आणि पँटमध्ये दिसला. आता करीना आणि फराजची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल करीत आहेत.

आणखी वाचा – Video : थांबायचं नाय! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांचा स्वमिंगपूलमध्ये व्यायाम, फिट राहण्यासाठी जिद्द कायम, व्हिडीओ व्हायरल

She is shameless and needs to be boycotted https://t.co/bXmCZImyka

— rvaidyanath (@rvaidyanth) April 28, 2025

‘बॉलिवूडचे लोक देशद्रोही आहेत’
करीना कपूर आणि फराज मन्नान यांच्या फोटोवर एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांना पाकिस्तानला पाठवा”. दुसर्‍याने लिहिले, “बॉलिवूडचे लोक फक्त देशद्रोही आहेत, त्यांच्यावर बहिष्कार घालावा”. एका व्यक्तीने एक्स वर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “ते निर्लज्ज आहेत आणि त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे”. तर आणखी एक टिप्पणी करत म्हणाला, “हे बॉलिवूड कलाकार लज्जास्पद आहेत आणि त्यांच्यावर बहिष्कार घालावा”. पाकिस्तानी कलाकारांसाठी पहलगम हल्ला त्रासदायक झाला आहे.

आणखी वाचा – प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिणं कितपत योग्य?, तुम्हीही याचा वापर करत असाल तर काय होतं?, जाणून घ्या…

२२ एप्रिल रोजी पहलगममधील दहशतवादी हल्ल्यात २८ जणांनी आपला जीव गमावला. भारताने पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या प्रकाशनावरही बंदी घातली आहे. त्याच वेळी, हनिया आमिर सरदार जी ३ या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार होती मात्र या हल्ल्यानंतर एका रात्रीत अभिनेत्रीची जागा दुसऱ्या अभिनेत्रीला देऊ केली.

Tags: kareena kapoorKareena Kapoor Trolledkareena kapoor with pakistani designer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Ankush Chaudhari New Song

रुबाबदार भूमिका, दमदार आवाज अन्…; अंकुश चौधरीच्या आवाजात स्वरबद्ध झालं 'पीएसआय अर्जुन'मधील गाणं, बॉलिवूड गायकाचीही साथ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.