शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुबाबदार भूमिका, दमदार आवाज अन्…; अंकुश चौधरीच्या आवाजात स्वरबद्ध झालं ‘पीएसआय अर्जुन’मधील गाणं, बॉलिवूड गायकाचीही साथ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 29, 2025 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankush Chaudhari New Song

अंकुश चौधरीच्या आवाजात स्वरबद्ध झालं 'पीएसआय अर्जुन'मधील गाणं, बॉलिवूड गायकाचीही साथ

Ankush Chaudhari New Song : सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट ‘पी.एस.आय. अर्जुन’ सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईजही घेऊन आला आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज झाले असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्वत्र ट्रेंडिंग ठरत आहे. बॉलिवूडलचे प्रसिद्ध गायक ज्यांनी ‘पुष्पा टायटल साँग’, ‘जबरा फॅन’, ‘क्यूटीपाय’, ‘स्लो मोशन’ यांसारखी हिट गाणी देणारे गायक नकाश अजीज व अंकुश चौधरीच्या जबरदस्त आवाजातील या गाण्याला अनिरुद्ध निमकर यांनी कमाल संगीत दिले असून जयदीप मराठे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

संगीतकार अनिरुद्ध निमकर म्हणतात, “‘धतड ततड धिंगाणा’ या गाण्याची चाल आणि कॅची संगीतामुळे ते अत्यंत धमाकेदार बनले आहे. या गाण्यातील काही संवाद गाण्याला आणखी आकर्षक बनवतात. आम्हाला वाटले, की जर अंकुश दादांच्या आवाजात हे गाणे सादर झाले तर ते अधिक जबरदस्त होईल आणि प्रेक्षकांना देखील अधिक भावेल. मात्र जेव्हा आम्ही त्यांना विचारले, तेव्हा ते यासाठी तयार नव्हते. त्यांच्या मते, नकाश अजीजसारख्या उत्तम गायकाचा आवाज असताना माझ्या आवाजामुळे गाण्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र माझा आणि नकाशचा हट्ट होता की हे गाणे अंकुश दादांच्या आवाजातच व्हायला हवे. त्यामुळेच आज या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे”.

आणखी वाचा – “पाकिस्तानात पाठवा”, पहलगाम हल्ल्यानंतर करीना कपूरने पाकिस्तानी डिझाइनरसह पोज देताच नेटकरी भडकले, म्हणाले, “बॉलिवूडचे देशद्रोही…”

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

निर्माते विक्रम शंकर म्हणतात, “पी.एस.आय. अर्जुन या चित्रपटातील अंकुशच्या रुबाबदार, दमदार भूमिकेला शोभेल, असे हे प्रमोशनल साँग त्याच्याच आवाजात प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. हे गाणे बॉलिवूडला जबरदस्त गाणी देणाऱ्या नकाश अजीज यांनी गायले असून त्यात सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या रॅपने अधिक रंगत आणली आहे. संगीतप्रेमींना हे गाणे आवडतेय, यातच आनंद आहे”.

आणखी वाचा – Video : थांबायचं नाय! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांचा स्वमिंगपूलमध्ये व्यायाम, फिट राहण्यासाठी जिद्द कायम, व्हिडीओ व्हायरल

‘व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा’, ‘ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट’ निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Ankus Chaudhari New Songmarathi movienakash aziz song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Rubina Dilaik Weight Loss Journey

आई झाल्यानंतर ५५ दिवसांत रुबीना दिलैकने घटवले ११ किलो वजन, परफेक्ट फिगरसाठी जाणून घ्या अभिनेत्रीचे डाएट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.