शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बंधनात अडकत असले तरी…”, ‘कन्यादान’ फेम अभिनेत्रीच्या Bride To Be पार्टीचे फोटो आले समोर, मित्र मैत्रिणींसह धमाल केली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 19, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kanyadan serial fame actress amruta bane celebrate bride to be party with friends photos viral on social media see the details

"बंधनात अडकत असले तरी...”, ‘कन्यादान’ फेम अभिनेत्रीच्या Bride To Be पार्टीचे फोटो आले समोर, मित्र मैत्रिणींसह धमाल केली अन्...

छोट्या पडद्यावरील ‘कन्यादान’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता बने. मालिकेत वृंदा ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत तिच्याबरोबर अभिनेता शुभंकर एकबोटे हादेखील आहे. मालिकेतील ही रील जोडी त्यांच्या रिअल आयुष्यातही आता एकत्र आली आहे. अमृता व शुभंकरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याविषयी सांगितले. अमृता व शुभंकर हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

अशातच लग्नाअगोदर नुकतीच अमृताची ‘Bride To Be’ पार्टी पार पडली. अमृताच्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी या पार्टीचे आयोजन केले होते. अमृताची ही Bride To Be पार्टी एका निसर्गरम्य ठिकाणी पार पडली आहे. या पार्टीसाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तसेच भिंतीवर फुग्यांनी छान डेकोरेशनही केले असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्टीचे काही क्षण अमृताने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Bane (@amruta.bane14)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “अंकिता नवऱ्याला देव मानते अन्…”, विकी जैनने आयेशा खानला मिठी मारताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “खरंच मूर्ख…”

अमृताने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे हे खास फोटो पोस्ट करत असे म्हटले आहे की, “मी बंधनात अडकत असले तरी आम्ही एकमेकांना भेटण्याचे, योजना बनवण्याचे, चिडवण्याचे, आणखी आठवणी निर्माण करण्याचे आणि बरेच काही करण्याचे वचन दिले आहे. माझ्या काही जवळच्या व्यक्तींसह पुन्हा एक नवीन अध्याय सुरु होत आहे.”

आणखी वाचा – “आपल्या शूजची साईज…”, आदेश बांदेकरांना वाढदिवसानिमित्त लेकाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “माझ्या मनाची…”

अमृताच्या या Bride To Be पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  

Tags: amruta baneentertainment newskanyadanmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsmarathi serialअमृता बनेकन्यादानमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Mitali Mayekar Answers To Trollers

घाणेरड्या शब्दात कमेंट करत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "तुम्ही लवकर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.